पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या पुस्तकावर अभिप्राय. डाक्तर गणेश कृष्ण गर्दै एल्. एम्. अॅन्ड एम् व रावसाहेब नागेशराव विनायक बापट यांचाः श्रीमंत अहल्याबाई होळकर यांचे चरित्र रा० गजानन चितामण देव यांनी लिहिले ते आम्ही साद्यंत वाचून पाहिले. चरित्र एकंदरीत चांगलेच वठले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. याची भाषा शुद्ध, सरळ व सुबोध असून त्यांत ऐतिहासिक माहिती व बोधपर भाग बराच आला आहे. पहिल्या दोन तीन भागांतलें वर्णन मात्र केवळ ऐतिहासिक नसून काव्यात्मक चरित्राच्या धरतीवर गेलेले दिसते. इतर भागांतील वर्णन प्रायः इतिहासप्रसिद्ध गोष्टींच्या आधारावर केलेले आहे. मुलांना आणि मुलींना वाचावयाला योग्य अशा ग्रंथामध्ये सदर चरित्राला जागा मिळण्यास ते विशेषेकरून पात्र आहे. पुणे, ता०२४-७-९५. गणेश कृष्ण गर्दे. नागेश विनायक बापट.