पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १५ वा.


अंतकाल आणि उपसंहार.


 आपली प्रिय कन्या सौभाग्यवती मुक्ताबाई इचा चिरकालिक वियोग झाल्यावर कोणत्याही ऐहिक गोष्टीपासून आपणास समाधान होणे नाही असा बाईसाहेबांचा निश्चय होऊन केवळ परलोकप्राप्तीचीच धर्मशास्त्रांत सांगितलेली कृत्ये त्या आचरूं लागल्या, व या उप्पर आपल्या हातून राज्यकारभाराचे काम होणार नाही अशा आशयाचे पत्र त्यांनी तुकोजीरावांस पुण्यास पाठवून त्यांस ते करण्याविषयी ताबडतोब इंदुरास निघून यावे असे लिहिले. आपल्या उपकारकवींवर मातेप्रमाणे पूज्यभाव ठेवून सदैव तिच्या आज्ञा पाळणारा तुकोजीराव हे पत्र पाहतांच इंदुरास यावयाचा; पण त्या वेळी श्रीमंतांचा निजामावर स्वारी करण्याचा विचार ठरला असून त्या महत्वाच्या कार्यातील प्रमुखत्वाचा बराच भाग त्यांनी त्याच्यावर सोपविलेला असल्यामुळे निरुपायास्तव त्यास तेथे राहणे भाग पडले. बाईसाहेबांसही ही त्याची अडचण कळल्यावर त्याच्या न येण्याचा राग न येतां त्यांनी तो येई तोपर्यंत राज्याची सर्व व्यवस्था आपल्या विश्वासुक दिवाणाकडेस सोपविली, व संकल्प केल्याप्रमाणे सर्व ऐहिक व्यवहारापासून त्या अलिप्त राहिल्या. त्यांच्या वयास या वेळी साठ वर्षे परिपूर्ण झाली होती व अनेक प्रकारच्या शारिर श्रमांनी व मानसिक