पान:अस्पृश्य -विचार.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

आणि रोहिदास याच पवित्र पुरातन नांवांभोवती त्या त्या जातीचे लोक गोळा होत आहेत. ज्या जातींना इतिहास, सामाजिक दर्जा आणि धर्मज्ञान यांचा पाठपुरावा आहे त्यांच्या विभूति या तीनहि प्रदेशांत सांपडतात. पण महार-चांभारांना या गोष्टी लाभल्या नाहीत. त्यांना भागवतधर्माचे एकच ठिकाण गुणोत्कर्षाला मिळाले आणि त्या ठिकाणी त्यांना विभूति प्राप्त झाल्या. पण हे ठिकाण मिळवून देण्याचे काम त्रैवर्णिक संतांनी केले हे विसरता कामा नये. आपला भूतकाळ म्हणजे कोरा कागद आहे असेंच महार-चांभारांनी वाढू देऊ नये. 'सर्व गोष्टींचा परित्याग करून मला शरण ये' म्हणणाऱ्याच्या राज्यांतील अमीर-उमराव त्यांच्या पूर्वकालांत होऊन गेलेले आहेत आणि ही परिस्थिति पूर्वग्रह झिंजाडून देऊन दीनांना जवळ करणाऱ्या संतांनी उत्पन्न केली ही गोष्ट अस्पृश्य व तदितर यांनी अवश्य ध्यानात ठेवावी.
 शिवाय त्रैवर्णिकांच्या दुसऱ्या एका चळवळीचा फायदा अस्पृश्यांना आपाआपच मिळणार आहे. प्रस्तुतच्या राजकीय चळवळीचे कष्ट खरोखर त्रैवर्णिकच करीत आहेत. मनानें, बुद्धीने व शरीराने जे जे काही करणे जरूर आहे तें तें सर्व अस्पृश्येतर लोकच करीत आहेत कोणी कोणत्याहि मताचा असो, त्याच्या प्रयत्नाचा रोख स्वराज्याचे हक्क संपादण्याकडे आहे हे उघड आहे. पण त्या मिळणाऱ्या भावी स्वराज्याचे फायदे त्रैवर्णिकच घेणार आहेत असा कोणी लटका समज करून घेऊ नये. देशांत कारखाने व उद्योगधंदे सुरू झाले व भाकरी स्वस्त झाली तर ती म्हणजे केवळ त्रैवर्णिकांनाच होणार आहे असे मानण्यांत वादांतली आढी आणि पीळ दिसेल, पण त्याबरोबरच यथातथ्य ज्ञानाचा जाणूनबुजून केलेला विपर्यासहि दिसेल. एवढी इंग्रजसरकारच्या राज्याची प्रचंड दगडबंद इमारत पण तीहि गदगंदा हालविण्यास देशभक्तांनी कमी केलें नाहीं ; इतकी