पान:अशोक.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकाद्मानी. ԿԿ कारवाडा किंवा वाडा म्हणतात. वाडी हें स्त्रीलिंगी रूप लघुत्व दाखवितें. चौ-वाडी चारचौघेजण जमण्याचें ठिकाण तें चावडी. रा. भारदे परस्पर घरकी व गांवकी व्यवहार एकमेकांत किती गुरफटले होते व आहेत हें जातवतनदार व गांववतनदार ह्यांच्या कामांचें वर जें दिग्दशंन केलें आहे त्यावरून लक्षांत येईल. चावडीवर नुसते सरकारी व सार्वजनिक व्यवहारच होत नसत. खाजगी वाद, भानगडी सुद्धां चावडीवरच येत. मोठ्या वस्तीच्या गांवांत जातीजातींनीं आपापल्या स्वास सार्वजनिक कामासाठीं गांव-चावड्यांखेरीज स्वतंत्र जात-चावड्या बांधल्या आहेत. शहरांतून अनेक पेठा आणि त्यांच्या अनेक चावड्या व पाटीलकुळकर्णी पाहण्यांत येतात. महार,मांग वगैरे अस्पृश्य जातींच्या लोकांना गांव-चावडींत यऊन बसतां येत नाहीं; म्हणून बहुतेक खेड्यांत एक गांव-चावडी व दुसरी महार-चावडी अशा दोन चावड्या नजरेस पडतात. पाटलाची गादी गांव-चावडींत असते. तेथें पाटीलकुळकर्णी आपली कचेरी करतात, आणि आपल्या नानाविध वतनदार नोकरांच्या मदतीनें गांवचा कारभार हांकतात. सर्व प्रकारच्या पट्टया-विशेषतः सरकार-सारा-पटविण्याचें मुख्य ठिकाण चावडी असल्यामुळे चावडी शब्दाचा विशेष अर्थ सरकार-पट्टी असा झाला आहे. चावडी दिली म्हणजे सरकार-सारा दिला असा अर्थ होतो. लोक नेहमीं पट्टोपासोडी हा जोड शब्द वापरतात, त्यांत पासोडी ह्याचा अर्थ पाटील हक असा असावा; कारण पाटील इनामाला 'पासोडी’ इनाम म्हटलेलें जुन्या कागद पाहूं आणि गांव-मुकादमानीचें थोडक्यांत सिंहावलोकन करूं. गांवचीं देवस्थानें, धर्मादाय, जत्रा, उत्सव, खेळ, परगणे-अंमलदार, गांव-मुकादम इत्यादींच्या सरकारनें मंजूर केलेल्या गांवावर खर्च पडणा-या नेमणुका व वर्षासनें; गरिबांना भिक्षा, आणि आल्यागेल्यांची सरबराई; अधिका-यांना नजरभेटी आणि चिल्हर खर्च; वगैरे बाबती