पान:अशोक.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वृत्ति. ३९ अमुक वसूल व अमुक चाकरी घेण्याचा ठराव करून गांवाच्या दिमतीला सबंध काळी-पांढरी लावून दिल्यामुळे गांवांनाही जरूरीप्रमाणें इनाम देण्यास ऐपत व मुभा होती. तेव्हां इनामांचे दोन भाग पाडतात-सनदी आणि गांवनिसबत. राजानें दिलेल्या इनामांना सनदी म्हणतात व गांवजमिनींतून किंवा गांवच्या उदिमावर अगर प्राप्तीवर गांवानें दिलेल्या इनामांना गांवनिसबत इनाम म्हणतात. इनाम देण्याचे मुख्य हेतु दोनचाकरी आणि मेहरबानी. जे स्वतः किंवा ज्यांचे पूर्वज विशेष रीतीनें सरकाराच्या कामास आले, किंवा मर्जीस उतरले त्यांना पारितोषक, म्हणजे कोणत्याही प्रस्तुत अगर भावी चाकरीची अट न घालतां जे इनाम देण्यांत आले ते कृतज्ञतापूर्वक किंवा मेहरबानीखातर दिलेले इनाम होत.हे इनाम जात-इनामांत मोडतात. राजघराण्यांतील किंवा सरदारघराण्यांतील आहेत. नोकर-इनामांचे ठोकळ तीन भाग पडतातः ( १ ) सरकारच्या लष्करी किंवा मुलकी नोकरीच्या शतींवर दिलेले जागीर, फौजसरंजाम, अगर जातसरंजाम यांसारखे इनाम (* जा ' किंवा ' जे ' म्हणजे जागा, नेमणूक; * गिर ? म्हणजे प्राप्त होणें. ' सरंजाम ’ म्हणजे सामुग्री, सामान. मुसलमानांनीं दिलेल्या इनामांना जागीर अथवा जहागीर व मराठयांनीं दिलेल्या इनामांना सरंजाम म्हणत. सरंजाम व जहागीर K - RINN ह्यांमध्यें विशषसा फरक नाही. ); (R) देऊळ, समाधे, मशीद, दगा वगरमधील पूजाअर्चा, दिवाबत्ती, झाडसारवण, उत्सव, यात्रा, उरूस, हगामे यांसारखे समारंभ, इत्यादि चालविण्यासाठी दिलेले धर्मादाय किंवा देवस्थान इनाम; (३) गांव, महाल, परगण्याची महसुली, फौजदारीसंवेधानें गांवकों व घरकों कामें करणा-या गांवकामगारांना व परगणे काळीचें उत्पन्न-स्वामित्व नव्हे-म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार, किंवा इनाम जमीन धारण करणारांना महसुलाची सर्वस्वी अभर अंशतः सूष्ट देण्यांत आली. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. प्रत्यक्ष