पान:अशोक.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत. " قاع जागा ग्रामाभिमानानें पटकावली व तोही पुढे वतनलोभांत लय पावला. आतांप्रमाणें प्रवाससौकर्य, व्यापारविस्तार, आणि नियमबद्ध कारभार व तो चालण्यास जरूर तें राजबल ह्यांचा भरपूर आश्रय नसल्यामुळे आपापले उद्योगधंदे आणि प्रपंचाचे नित्य व्यवहार अव्याहत चालू ठेवण्यासाठीं खेड्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी हेोणें अवश्य झालें. हमेषचा सर्व प्रकारचा व्यवहार गांव आपल्या अखत्यारीवर करी, आणि राजाधिकारी किंवा धर्माधिकारी त्यांत काचित् चित्त घालीत. जीवित किंवा वित्त संरक्षण करण्याच्या कामीं शिवभावांचें किंवा राजाधिका-यांचें वेळेवर सहाय्य मिळेलच असा भरंवसा नव्हता. त्यामुळे गांवावर जी धोंड येई तिचें ओझें सर्व गांवानें समाईक उचलण्याखेरीज गत्यंतर नव्हतें. ज्या गांवाला बाजार नसतो, किंवा असूनही वेळेवर सौदा मिळण्याचा संभव नसतो तेथले धोरणी संसारिक जसे सवडीनुसार हरएक वाण संपादन करून लावून ठेवतात आणि वेळेवर काढतात; त्याप्रमाणें गांवगाड्याच्या योगक्षेमासाठीं जरूर ते राजाधिकारी, धर्माधिकारी, ग्रामरक्षक, हुनरी, मजूर, मनोरंजन करणारे, त्यानें आपले संग्रहास वंशपरंपरेनें ठेवले. खरेंपाहूं गेलें तर प्रत्येक गांव हा एक तुटक जनसमाज किंवा स्वतंत्र राज्यच झालें, आणि राज्यांतील इतर वैभागांशीं त्याचा इतका कमी संबंध येत होता कीं, तो असून नसल्यासारखा होता. सिंधप्रांतीं गांव वसविणा-या घराण्यांना समुच्चयानें राज (राज्य) म्हणतात. ही गोष्ट वरील विधानाच्या प्रत्यंतरादाखल लक्षांत घेण्याजोगी आहे. सबंध काळी-पांढरीची सामाजिक व राजकीय जबाबदारी गांवानें सर्व मिळून घ्यावी, होतां होईल तोंपर्यंत त्याला कोणत्याही कारणोंनें परगांवापाशीं किंवा खुद्द सरकारापाशीं सुद्धां तोंड वेंगाडण्याची गरज पडूं नये हें ध्येय सतत डोळ्यापुढें ठेवून आमच्या पूर्वजांनीं गांवगाडा भरला, आणि त्यांना तो अंतर्बाह्य व्यवहारांत जितका स्वयंसमाविष्ट करतां आला तितका करण्यांत त्यांनीं यत्किंचित कसूर केली नाहीं. म्हणून तो पूर्वीच्या बेबंदशाहींतून वांचून निघाला. ह्या R