पान:अशोक.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

33. Irriser ftit a Piżi, गद्रवTड, জুলজা লুফোিন্ধ ঝাড়, সুখী-৬teষ্ট্ৰঞ্জ गाँव-शाडा. भरित. -wmvK»M- पुराणांतरीं गांवाची व्याख्या अशी दिली आहे तथाश्शूद्रजनप्राया सुसमृद्धकृषीवला । क्षेत्रोपभोगभूमध्ये वसतिग्रमसंज्ञिता ॥ जिच्यासभोंवतीं कीर्दसार-वहितीला योग्य-जमीन आहे, आणि जिच्यामध्यें मातबर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत, अशा वस्तीला गांव म्हणतात. गांवच्या हद्दीला किंवा सीमेला * शींव ” ही संज्ञा आहे. गांवाचे स्वभावतः आणि एकमेकांपासून अलग असे दोन भाग उघड उघड पडतात. एक * पांढरी ? किंवा गांवठाण आणि दुसरा ‘काळी’ किंवा रान. काळी आणि पांढरी ह्या संज्ञा जमिनीच्या रंग व गुणधर्मावरून प्रचारांत आल्या असाव्या. काळी जमीन काळी किंवा काळसर असून भुसभुशीत असते, ती पाणी धरते व खचते. पांढरी जमीन पांढरसर, आवळ व निबर असून पाणी ढाळते. ह्यामुळे काळी जमीन जितकी वहितीला उपयोगी, तितकी इमल्याला नसते; आणि पांढरीवर जसा इमल्याला धर सांपडतो, तसा कंदमूलांना किंवा उद्रजांच्या मुळ्यांना तिच्या पोटीं वाव सांपडत नाहीं. प्रत्येक गांवांत शक्यतेप्रमाणें पांढ-या जमिनीची योजना गांवठाणाकडे आणि काळीची योजना शेतवाडीकडे झालेली दिसते ती निसर्गानुरोधानेंच आहे, हें कोणाच्याही लक्षांत येईल. तेव्हां गांवाच्या ज्या जागेवर मनुष्यें घरेंदारें करून नांदतात तिला पांढरी, आई-पांढर किंवा गांवठाण म्हणतात, आणि ज्या