हे पान प्रमाणित केलेले आहे.
त्याचा मस जिमीनजुमला, घर हाय, काय बी खरचात न पाडता लगीन करून घेतील असं सम्दं सांगितलं. म्या तर लगीन हुयाच्या आंदी नीट पायलं बी न्हवतं त्यांला. धापाच मान्सं आलीवती त्यातलं कुटलं म्हून म्हाईत बी पल्डं न्हाई मला." ती एकदम लहान मुलीसारखी खिदळली.
आता लग्न झालंय, दोन मुलं आहेत. नवरा बऱ्यापैकी सुस्वभावी आहे, दारू पीत नाही, मारहाण करीत नाही. शिवाय सवतीला सोडून हिच्यापाशी येऊन राहिलाय. कामधंदा करून चांगलं मिळवून आणतोय. थोडं त्याच्याशी जमवून घेऊन दोघांनी सुखासमाधानात राहावं असं तिला मुळीच वाटत नव्हतं का? नवऱ्याला आणि कदाचित आईबापांनाही शिक्षा करण्याच्या भरात ती स्वत:ला सुद्धा शिक्षा करून घेत होती. पण मी तिला असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं ओठ घट्ट मिटून घेऊन चेहरा निर्विकार केला आणि काही प्रतिसादच दिला नाही.
॥अर्धुक॥
॥९७॥