पान:अर्धुक (Ardhuk).pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मात्र रागामुळे लाभलेलं अवसान गळालं आणि ती खूप रडली. पण शेवटी म्हणाली, "जे माझं नव्हतंच त्याच्यासाठी मी का रडतेय?" ती डोळे पुसत कामाला लागली.
 बरेच दिवस लोटले. सुवर्णा आता कामातही जास्त गुंतली होती. एक दिवस प्रसाद तिला पुन्हा भेटायला आला. तिनं जरा बेफिकिरीनंच त्याला विचारलं, "काय रे?" तो म्हणाला, "परवापासून दोनदा तुला गावात पाहिलं तेव्हा तुझ्याबरोबर कोण होता?" आमच्या संस्थेत नवीन एकजण लागलाय तो असेल."
 "अस्सं, त्याच्या आणि तुझ्यात काही आहे वाटतं?"
 नवीन माणसाचं लग्न झालेलं होतं पण सध्या तो एकटाच आला होता आणि ती त्याला रहायची जागा शोधायला मदत करीत होती. पण तिनं प्रसादला हे सगळं सांगितलं नाही. ती फक्त मोठ्याने हसली.

॥अर्धुक॥
॥५२॥