हे पान प्रमाणित केलेले आहे.
राहिली. तो उशिराच घरी आला. त्याची चाहूल लागली तशी ती उठून बाहेर गेली. त्याच्या मागोमागच त्याच्या घरात शिरली नि तिनं त्याला काठीचे तडाखे हाणायला सुरूवात केली. तिनं एकाएकी हल्ला केल्यामुळे तो इतका बावचळला की त्याला प्रतिकार करायचंही सुचलं नाही. बरं, सासूकडनं मार खाताना आरडाओरडा केला तर चार लोकांत शोभा व्हायची. तिचा राग शमला तोवर त्याची पाठ काळीनिळी झाली होती.
तो पुटपुटला, "सासूनं जावायाला मारायचं असलं इपरीत कुटं घडतं का कंदी?"
ती म्हणाली, "पुना तुमीमला येडंवाकडं बोलला त्येबी चार लोकांसमोर, तर म्या तुमाला जितं सोडणार न्हाई येवढं ध्यानात ठिवा."
॥अर्धुक॥
॥२४॥