पान:अर्धचंद्र.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ --सहज मजला तो म्हणे, * सांग तूझें प्रेम कोणावर असे वैसलेलें ? " प्रश्न ऐकुनि विक्षिप्त असा त्याचा हसू आलें पण दाविलें न कांहीं ! -नांव कोणाचें तरी घ्यावयाचें असें पडलें मजपुढ़ें प्रश्नचिन्ह ? आणि पोरींची रम्य चित्रशाळा सहज नयनांसी लागली दिसाया ! -कशी ऐशा सौंदर्यसागराची त्यास द्यावी मी कल्पना करूनी ४ फुलें होतीं मजसभोंतीं अनेक आणि होतीं आनंद मजसि देत ! -असें असतां घेऊन एक नांव कसें हृदयानें कृपण मीं रहावें ? तरी खोटें सांगून एक नांव करुनि त्याचें टाकिलें समाधान ! -दार खजिन्याचें खुलें जाहलेलें बबुनि त्याला किति समाधान झालें ! -आणि तेव्हांपासून मला आतां नांव घेउन चिडविण्या लागतो तो ! २७-२-३४ पुणें.