पान:अर्धचंद्र.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

去 अर्धचंद्र शनिवारवाडच्यास सभोंवतालीं कितिदां तुझिया वणवण फिरला गणति न त्याला स्फूर्ति परन्तू एकहि वेळा आलि न कांहीं-करण्यास तुझ्यावर गाणीं ! फिरुनी फिरुनी हाय ! जिवाची होउन जाते किती काहली ! विभवासम तव ममही जाई वैभव दूर-जागेचा दिसतो गूण ! तुजसी बघतां सुचती गाणीं किती कवींना वीररसाचीं निजलेल्यांना उठवायाचीं ! परि हें मातें-सुचलें रे ! बघ रडगाणें ! किमर्थ रचलें मग हें गाणें निरर्थ रसिकां त्रासविणारें आणिक त्यांना नावडणारे गाणें माझें–आनंद मला दे भारी ! देव दिसे कीं फूल वहाणें ! गुरुजन दिसतां वंदन करणें! तुजसी बघतां गाणें करणे ! म्हणुनिच आहे-रचलें हें तुजवर गाणें ! २९-१०-२८ क-हाड.