पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अमेरिकेची मुक्त अर्थव्यवस्था असून त्यांनी खूली स्पर्धा स्विकारून संरक्षण दिले आहे. परंतु आपण आयएमएफ गॅटच्या अटी जवळपास जुलै १९९१ सालापासूनच स्विकारल्या आहेत. जसे एनआयपीद्वारे व नवीन आयात-निर्याय धोरणाद्वारे अंदाजपत्रकात RD ला महत्त्व देणे इत्यादी. या सर्व कारणांमुळेच गरीब आणि श्रीमंत देश तयार झाले. त्यातील विषमता वाढण्याकरिता आजही विकसित देश कोणत्या ना कोणत्या मार्गाचा उपयोग करण्यात पुढे आहेत. त्यांनी जगात regional strocks तयार करुन आपल्या नीतींना पुढे आणण्याचा प्रयत्न चालू आहे. कर्जाच्या दबावाखाली शिथीलीकरण नीती पत्करण्यास भाग पाडत आहेत. असा प्रयोग अमेरिकेने साऊथ कोरियामध्ये केला आहे. त्यांचा निर्यात दर वाढला आहे. पण त्यांच्या प्रत्येक कंपनीवर अमेरिकेचे अधिपत्य आहे. भारताला स्वताच आशियाई देशांमध्ये पुढाकार घेऊन आपल्या निर्यातीची नवीन दिशा व रचना शोधायला पाहिजे. विकसित देशांच्या पुढे येण्याची हिंमत स्विकारणे आवश्यक आहे. त्याकरिता उद्योग, शेती, व्यापारात नवप्रवर्तन करणे अधिक फायद्याचे ठरेल. Skilled/semi skilled श्रम तयार करायला पाहिजे. हे जरी कठीण असले तरी अजिबाद अशक्य नाही. One worldism ची नीती या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडली जात आहे. त्यात जर friendly aproach towards dedicating countries ठेवला तरच हा प्रस्ताव खर्या

अर्थाने लागू करण्यात अर्थ आहे.

अर्थाच्या अवती-भवती । ४८