पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. १९८० मध्ये तिसऱ्या देशांनी ६० बिलियन खर्च हा सैन्य व शस्त्रांवर केला आहे. १९८३ साली याच्यात ५०% वाढ झाली. त्यात वर्षीचा तिसऱ्या जगातील कुपोषित लोकांचा आकडा ५०० लक्ष इतका होता. त्यात ७५ टक्के लोकांना पिण्याचे पाणी नीट प्यायला मिळत नव्हते. तरीही तिसऱ्या देशातील अधिकारी वर्ग असा खर्च करायला तयार होता. त्यामुळे तिसऱ्या जगातील बहुतांशी लोकांनी आपल्या अंदाजपत्रकांची रचना बदलली होती. या देशांना वित्तीय स्थिरता आणि रचनात्मक समायोजन करणे आवश्यक होते. यात १०० टक्क्यांपैकी ११ टक्के दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी खर्च करण्याचे ठरवले होते. संरक्षणाकरिता हा खर्च पाच टक्के असला पाहिजे अशी अट होती. या पद्धतीमुळे गरिबांच्या अधिक शोषणाची सुरुवात झाली. ही सामुग्री घेतल्यानंतर त्याचे शोषण करण्याकरिता गरिबांवर अधिक कर, अप्रत्यक्ष कर लावणे, अधिक बेरोजगारी आणि सार्वजनिक सेवेत कपात इत्यादी सुरू करण्यात आले.
 अशा पद्धतीमुळे तिसऱ्या देशातील सरकार हे जागतिक बँकेच्या हातातले बाहुले झालेले आहे. जागतिक बँकेच्या प्रमुखाने मागेच स्पष्ट केले आहे की, प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्त्वाकडे लक्ष देणे आवश्यक नाही. त्यामुळे मानवीय शोषणाबरोबर जेट रॉकेट्सची खरेदी चालूच आहे.
 बुधो यांचे मत आहे की, असे वित्त समायोजन आम्ही करत आलो आहे. जागतिक बँकेने वित्त व विकास हे स्वतःचेच कौतुक करणारे प्रकाशन (Self Congratulation Publication) काढले आहे. त्यात दक्षिण देशातील गरीबांच्या स्थितीचा काहीच स्पष्ट उल्लेख नव्हता.
 आता स्थिती अशी आहे की, तिसऱ्या जगाच्या मूळ समस्या इतक्या वाढल्या आहेत की, सर्व देशांना पूर्ण करणे अत्यंत कठीण आहे. एक पूर्ण केल्यास दुसऱ्या समस्या उभ्या राहतात. याचे अपवाद म्हणजे यूगोस्लाविया आणि ग्रेनेडा. त्यांनी सामाजिक सुरक्षेत बरीच समाधानकारक प्रगती केली आहे.
 कोषाच्या मते, समाजवादी देशांना आपल्या देशात आमूलाग्र बदल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आमच्या पाश्चिमात्य पद्धती किंवा मुक्त व्यापार पद्धतीचा स्वीकार करा आणि दारिद्रय निर्मूलन करा, असे सांगण्यात येत आहे.
 बुधो म्हणतात, वित्तीय स्थिरता व रिगनरचा पैसावाद (Reganite monetarism) पद्धती तिसऱ्या जगात जेव्हा आम्हाला पोचवायला सांगितले तेव्हा आमचा स्टाफ असे करायला अतिशय उत्सुक होता. बुधो यांनी त्याला

staff is running amoke या शब्दांत मांडले आहे.

अर्थाच्या अवती-भवती । २९