पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्थिक परिस्थितीशी मुळीच जुळणारे नव्हते. असा निर्देशांक तो तयार करून विकसनशील देशांना दिला जात आहे. (Manufactured Statistical Indices). तो त्या देशांच्या परिस्थितीशी जोडणारा असो किंवा नसो याचा विचार केला जात नाही. उलट असे अपेक्षित असते की, या देशांनी आपली आर्थिक परिस्थिती बदलून कोणाकडून RULC निर्देशांक विकत घ्यावा आणि असे वातावरण त्या देशांमध्ये तयार करण्यात यावे. हा निर्देशांक तिथल्या परिस्थिती बरोबर जुळणारा असेल.
 ट्रिनीडॉड व टोबेगाची सांख्यिकी माहिती - हा निर्देशांक १९८५ मध्ये (दोन्ही देशांचा) प्रत्यक्षात ६९ टक्के होता, तर कोषांच्या रिपोर्टप्रमाणे ही वाढ १४५.८ टक्के दर्शविली गेली. गेल्या पाच वर्षांमध्ये ही वाढ ६६ टक्के होती. तर १९८६ च्या आय.एम.एफ. अहवालात ती वाढ १६४.७ टक्के दर्शविण्यात आली. त्यांचा जो स्टाफ रिपोट (RED RESENT ECONOMIC DEVELOPMENT) मध्ये अशा बऱ्याच चुका आढतात. १९८९ मध्ये तयार केलेल्या आय. एम.एफ.च्या अहवालात अनेक प्रकारच्या चुका होत्या. (internal mistake). त्या कधीच RULC निर्देशांकाद्वारे सुधारता आल्या नाहीत. यात अवमूल्यन, सार्वजनिक क्षेत्रांना कमी करण, श्रम कपात यासंबंधातील आकडे अनेक अल्पविकसित देशांचे विचार न करता मांडलेले आहेत.
 विभिन्न सूचनांद्वारे टप्प्याटप्प्याने अवमूल्यन करत राहा, असा संदेश देण्याकडे अधिक भर दिला जात होता. असे सर्व आकडे या दोन देशांकरिता मांडत असताना १९८७ मध्ये आय.एम.एफ.च्या अटी मान्य करणे आवश्यक आहे, असे ठामपणे सांगण्यात आले. बुधो यांनी त्याला किंवा अशा उद्देशांना गरम बटाटा (Hot Potato) या देशावर टाकला गेला, अशी उपमा दिली आहे. अशी परिस्थिती त्या देशांना कशी परवडणार होती.
 त्याचा परिणाम असा झाला की, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या नऊ टक्के इतकी सरकारी व फेडलेली बिलं तुंबलेली होती. तेल निर्यात कमी झालेली होती. आणि निर्यातीतील तूट १३ टक्क्यांनी वाढली. (GDP base). या देशाचे प्रत्यक्षात आकडे व आय.एम.एफ.च्या आकड्यांमध्ये ३३ टक्के फरक होता. त्याच वेळेस दोन्ही देशांमध्ये निवडणुका होऊन नवीन सरकार आले होते. म्हणून ते आर्थिक परिस्थितीला तोंड देत होते आणि त्याचप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यावेळेस या संस्थांनी सूचविले की, नविन कर्जे घ्या आणि सरकारी खर्च कमी करा, अधिक खाजगीकरण करा.
 या दोन्ही देशांच्या विदेशी कर्जाच्या बाबतीत बुधो यांनी निराशाजनक

स्थिती मांडलेली आहे. तेल विकणाऱ्या देशांची स्थिती कर्जामुळे अत्यंत वाईट

अर्थाच्या अवती-भवती । २४