पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाली आहे. त्यांच्या आयातीच्या परतफेडीकरिता शिल्लक राहिलेले शुद्ध कोष (Net reservers) अत्यंत कमी व्हायला लागले. इक्वेडोरिया, नायजेरिया हे पेट्रोल उत्पादनात जास्त श्रीमंत देश आहेत. तिथे देखील अशा व्यवस्थेबाबत समस्या निर्माण झाली. एन्डोकोरिया, मेक्सिको या विभागात ठेवता येईल. या काळात आशियाई देश, चीन, भारत यांना वगळता इतर देशांची स्थिती जसे दक्षिण कोरिया आणि तायवानची स्थिती अत्यंत वाईट होती.
 या देशांनी आपली धोरणे बदलावीत याकरिता आम्ही मोठा भारी भक्कम स्टीम रोलर या देशावर चालवला. या स्टीमरोलरचा अर्थ-
१. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्र कमी करा.
२. किंवा त्या क्षेत्राला पुन्हा संघटित करा. (reorganirasation)
३. पुनगुंतवणूक करा. (recapitasation) म्हणजे त्यात लवकरात लवकर खाजगीकरण करा.
४. अपगुंतवणूक वाढवा. (Disinvestment)
५. पेट्रोलियम पदार्थांची वाढ करा. त्यांना पुनर्चलित (reactivation) करा.
६. कृषी व व्यापारामध्ये खाजगी व विदेशी गुंतवणूक करा.
७. पेट्रोल कर आणि देशी करांच्या स्वरूपात बदल करा.
 हे सर्व करताना एका देशाची मूळ समस्या काय आहे? यावर कधीच लक्ष वेधले गेले नाही. आय.एम.एफ.ने देशांना उलट ताकीद दिली होती की, आमच्या उद्देशांना थोडा देखील धक्का लावता कामा नये.
 ट्रिनीडाँड आणि टोबेगा या देशांची अवमूल्यनाची परिस्थिती एका चार्टद्वारे आकडे देऊन स्पष्ट केली आहे. त्याला बुधानी statistical monkey business म्हटले आहे. अधिक आवश्यक करायला सांगितल्यास आणखीन आवश्यक करण्याची ह्या देशांची नव्हती. तेव्हा आय.एम.एफ.ने सांख्यिकी युक्ती सुरू केल्या. जसे या देशांमध्ये विदेशी मदत बंद पडायची. (Freezing of founds) त्यामुळे ह्या देशांची स्थिती अधिक बिकट होईल. जेव्हा देशांत आर्थिक आणि वित्तीय अडचणी येतात. तेव्हा अशा देशांची सरकार आमचे अंतिम औषध (Deadlist Medicine) घेण्यास बाध्य होते. सर्व ऐकावे लागते.

भाग तिसरा : यात असांख्यिकी (Non statistical) क्षेत्रावर अधिक भर दिला आहे. यात सदस्य राष्ट्रांना दिलेल्या सारखेपणाचा (EvenHandedness) विचार मांडला आहे. पाच वर्षानंतर या संस्थाने दोन्ही देशांत करिता अहवाल तयार केला. त्यात आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याकरिता बरेच कार्यक्रम सूचविले.

त्याला रचनात्मक समायोजनातील प्रयत्न (Structural Adkustment effort)

अर्थाच्या अवती-भवती । २५