पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

द्यायला हवा. आठ टक्के लाभांश त्यांच्या भागभांडवलदारांना द्यायला हवा. तेव्हाच औद्योगिक विकास घडवून आणता येईल.
 प्रो. बॅनर्जी यांनी सरकारच्या भूमिकेचे व्यापक स्वरूप मांडले. विदेशी गुंतवणूक आणि देशी उद्योग याबाबत सरकारी हस्तक्षेप असावा. सरकारने निरंकुश धोरण बंद करून जनकल्याणाचे कार्य करावे, या स्पष्ट मताचे श्री. बॅनर्जी होते. प्रो.व्ही.जी.काळे यांनी वरील मतांचे समर्थन करून सांगितले की, भारतीय समस्यांना लक्षात घेऊन भारताच्या प्रत्येक प्रकारच्या उद्योगांच्या संरक्षणाची गरज आहे. कारण मुक्तव्यापार भारताच्या प्रमुख देशी उद्योगांचा नाश करेल. औद्योगिक व व्यापाराच्या बाबतीत ब्रिटन हाच भारताचा मोठा स्पर्धक बनेल. दोन्ही देशांनी आपसांत व्यापार करार करून एकमेकांस फायदा होईल, असे बघितले पाहिजे. त्याबरोबर विदेशी सूडभावनेला लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे. भारत परस्पर लाभाकरिता तसेच त्याकरिता नेहमी तयार राहील.
 भारताला स्वतः साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याकरिता संरक्षणाची आवश्यकता आहे. परंतु, इंग्लंडने आपल्या देशात स्वतंत्र धोरणाचा वापर करावा व फायदा घ्यावा म्हणजे देशाला जी पद्धती योग्य असेल कशी वापरावी, असे स्वतंत्ररित्या प्रत्येक देशाला ठरविण्याचा अधिकार आहे. आदर्श स्वतंत्र व्यापारनीती अर्थव्यवस्थेकरिता योग्य ठरू शकते. तरी त्यात राज्यासंबंधी बाबी सोडल्यास प्रशुल्काकरिता स्वतंत्र व्यापाराचे नियम काही प्रमाणात लावता येतात. १९२८ साली त्यांनी भारतीय संरक्षाबाबत भाषण केले. त्या भाषणात भारताने संरक्षणवाद स्वीकारावा याकरिता सैद्धांतिक व व्यवहारीक असे दोन्ही दृष्टीकोन मांडले अनेक देशी उद्योग बाजारांत स्पर्धक किंमतीपुढे टिकू शकत नाहीत. त्यामुळे आवश्यक भांडवल गुंतविण्याकरिता श्रमिकांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता संरक्षणाची आवश्यकता आहे. सरकारने योग्य मार्गदर्शन केल्यास स्वतंत्र व्यापाराचादेखील देशाकरिता फायदा करून घेता येतो, असे दुहेरी विचार त्यांनी मांडले होते. पाश्चिमात्य पद्धतीवर ते टीका करीत होते. त्यांच्या मते जर आर्थिक उदारमतवादी पद्धत शोषणाच्या उद्देशाला धरून नसेल तर पाश्चिमात्य देश गरजू देशांना मदत करू शकतील.
 देशाच्या बदलत्या परिस्थितीला लक्षात ठेवून मोठ्या उद्योगाकरिता पाश्चिमात्य पद्धतीचा उपयोग करायला हरकत नाही, असे विचार ब्रिज नारायण यांनी मांडले होते. भांडवल उभारण्याच्या दृष्टीने ते योग्य आहे. कारण प्रत्येकच अर्धविकसित व्यवस्थेची स्थिती सारखी आहे. या देशांना भांडवल निर्मितीसाठी

विदेशी मदतीवर अवलंबून राहावे लागते. पाश्चिमात्य आर्थिक जीवन हे

अर्थाच्या अवती-भवती । १८