पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वतंत्र विदर्भाची आवश्यकता - सक्षमता


 कोणत्याही राज्याची किंवा क्षेत्राची स्वतंत्र अस्तित्वाची कल्पना मांडताना तेथील सामाजिक, आर्थिक, राजकीय घटकांचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. कारण या क्षेत्राचा पूर्व इतिहास तेथील मानवीय व नैसर्गिक साधनसंपत्ती व आतापर्यंत अंमलात आणलेली धोरणे या सर्वांची पडताळणी करून बघणे आवश्यक ठरते.
 महाराष्ट्र राज्याचा एक प्रमुख भाग म्हणजे विदर्भ. आतापर्यंत अनेक विद्वानांनी विदर्भाच्या स्वातंत्र्याची बाब मांडली आहे. आपापली मते अनेक समस्यांना धरून पुढे आणली आहेत. एकूण महाराष्ट्राकडे बघितले तर हे राज्य फार समृद्ध राज्य म्हणता येणार नाही. इतर राज्यांप्रमाणे या राज्याचे अनेक भाग आजही अविकसित आहेत. त्यापैकी खनिज, वन, मानवसंपदाने पुरेपूर क्षेत्र म्हणजे विदर्भ होय. हे क्षेत्र अल्पविकसित असल्याने या क्षेत्रात अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांना दूर करण्याकरिता आणि महत्तम विकास करण्याकरिता स्वतंत्र विदर्भाची मागणी युक्त आहे.
 पहिला प्रश्न यासंबंधात निर्माण होतो की, केवळ स्वतंत्र विदर्भ केल्याने आपले सर्व प्रश्न मिटू शकतील का? किंवा सक्षम विकास व आर्थिक समृद्धता घडू शकेल का? केंद्राने आपली धोरणे बदलून विदर्भाला विकासाचे मार्ग खुले केले असते तर ही चळवळ कदाचित या रूपात आली नसती. हे मात्र तेवढेच खरे की, महाराष्ट्र राज्यात पूर्व-पश्चिम क्षेत्रीय असंतुलन बऱ्याच मोठ्या प्रमाणात

Photo source : www.mu.wikipedia.org

अर्थाच्या अवती-भवती । १०9