पान:अयोध्येचे नबाब.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ रा. Porom मनसूरअल्ली सफदरजंग. (इ० स० १७३९-इ० स० १७५४.) सादतखान मृत्यु पावल्यानंतर त्याचे दोन पुतणे शेरजंग व सफदरजंग ह्यांनी नादिरशहास अयोध्येची सुभेदारी देण्याबद्दल अर्जी केली. नादिरशहाने सफदरजंग हा सादतखानाचा जावई आहे असें पाहून व त्याजकडून २० लाख रुपये नजर घेऊन त्यास दिल्लीच्या बादशहाकडून अयोध्येची सुभेदारी देवविली. सफदरजंग ह्याचे मूळचें नांव मिा महमद मुकीम असे होते. त्यास सुभेदारी मिळाल्यानंतर त्याने मनसूरअल्ली सफदरजंग हे नांव धारण केले. ह्याच नांवानें तो इतिहासांत प्रसिद्ध आहे. सफदरजंग हा फार बुद्धिमान् व चतुर मुत्सद्दी होता. त्याने अयोध्येची सुभेदारी मिळतांच दिल्लीच्या बादशहाशी व दरबारचे बजिराशी सख्य ठेवून अयोध्येची राज्यव्यवस्था उत्तम प्रकारे करण्यास सुरवात केली. हा हिंदु लोकांवर फार प्रेम करीत असे. ह्याने आपल्या पदरी हुशार व स्वकर्तव्यदक्ष असे मोठमोठे हिंदु लोक निरनिराळ्या अधिकारांवर ठेविले होते. ह्याचा दिवाण राजा नवलराय म्हणून एक कायस्थ जातीचा गृहस्थ होता. तो राजकार्यधुरंधर असल्यामुळे पुढे फार प्रसिद्धीस आला. सफदरजंग ह्याने फैजाबाद येथे आपली राजधानी केली होती. ह्याच्या कारकीर्दीत दिल्लीदरबारांत अनेक घडामोडी झाल्या. त्यामुळे त्यास स्वस्थ- . पणाने अयोध्याप्रांतांत राहण्यास फारशी संधि सांपडली नाही. बहुतकरून तो दिल्लीस अथवा निरनिराळ्या ठिकाणी स्वारीमध्ये