पान:अयोध्येचे नबाब.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ रा. nehen सादतखान. (इ. स. १७२०-इ० स० १७३९.) औरंगजेब बादशहा मृत्यु पावल्यानंतर दिल्लीची बादशाही कमजोर झाली आणि 'बळी तो कान पिळी' ह्या म्हणीप्रमाणे ज्याच्या अंगी कर्तृत्वशक्ति व धाडस हे गुण अधिक होते त्यांना उदयास येण्यास संधि सांपडली. अशा समयास जे पुरुष महत्पद पावून स्वसत्ताधारी बनले त्यांत सादतखान व निजामउल्मुल्क हे प्रमुख होत. सादतखान ह्याचे मूळचे नांव महमद अमीन असे असून तो एका थोर सय्यद कुळांत जन्म पावला होता. मुसलमान धर्माचा संस्थापक जो महमद पैगंबर त्याच्या वंशजापैकी सहावा इमाम मुसा काझीम हा सादतखानाचा पूर्वज होय, असा उल्लेख सांपडतो. मुसलमानी इतिहासकार अलेक्झांडर डो ह्याने सादतखान हा एका दारोदार फिरणाऱ्या इराणी व्यापाऱ्याचा मुलगा होता असे लिहिले आहे; परंतु ती गोष्ट साधार नाही. कारण, ह्या इतिहासकारास सादतखानाचा नातू सुजाउद्दौला ह्याने काही देणगी दिली नसल्यामुळे, त्याने त्यावर रुष्ट होऊन त्याचे पूर्वज उच्च कुलांतील नव्हते असे दाखविण्याचा यत्न केला आहे ! सादतखान ह्याचे पूर्वज अधिकारसंपन्न व प्रतिष्ठित वर्गापैकी होते. ह्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण खोरासान जिल्ह्यांतील नैशापूर हे गांव होय. उत्तरेकडील मुसलमानांनी हिंदुस्थानावर स्वाऱ्या करून तेथील हिंदूंची साम्राज्यसत्ता नष्ट केली व तेथे आपला अंमल बसविला, त्या वेळी आपला भाग्योदय करून घेण्याकरितां जी मुसलमान घराणी हिंदुस्थानांत आली, त्यांपैकी सादतखानाचे पूर्वज