पान:अयोध्येचे नबाब.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ स्थलवर्णन. त्यांनी अखेरपर्यंत आपला दम सोडला नाही. अखेर युरोपियन सैन्य मदतीस येऊन त्यांची सुटका झाली व ब्रिटिश सत्तेचा विजयध्वज लखनौ येथे संस्थापित झाला. तो अद्यापि ह्या रेसिडेन्सिवर मोठ्या गर्वाने फडकत आहे. लॉर्ड क्यानिंग साहेवांनी ह्या इंग्रज सैन्याच्या शौर्याबद्दल असे उद्गार काढले आहेत की : "There does not stand records in the annals of war an achievement more truly heroic than the defence of the residency at Lucknow." हे उद्गार रेसिडेन्सीमधील एका खोलीमध्ये अद्याप कोरून ठेविले आहेत, व तेथेच दोन खणांमध्ये काचेच्या तावदानांची पेटी करून त्यांत ह्या युद्धाचा देखावा तयार केला आहे. तो प्रेक्षणीय असून लखनौच्या रणप्रसंगाचे भयंकर स्वरूप अद्यापि व्यक्त करीत आहे. असो. घर लिहिलेल्या मुख्य मुख्य इमारतींशिवाय लखनौ येथे बिबियापूर कोठी, हयातबक्ष कोठी, बेगमकोठी, अमदजअल्लीशहाचा मकबरा, नूरवक्ष कोठी, सादतअल्लीखानाचे थडगे, फरहतबक्ष राजवाडा, मच्छीभवन, रुमाई दरवाजा, दौलतखाना, हुसेनाबाद इमामवाडा, जुम्मामशीद, मोतीमहाल राजवाडा, खुर्शदमंझील, तारावाली कोठी, शहानजफ, कदमरसूल, अलमबाग, शिकंदरबाग, पादशहाबाग, विलायतीबाग, वगैरे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. ह्यांपैकी काही राज्यक्रांतीमुळे पूर्वीच्या स्वरूपास अगदी मुकली आहेत. काही कालचक्रास हार जाऊन आपल्या पूर्वस्वरूपांत नवीन त-हेचे मिश्रण घालुन जीवंत राहिली आहेत. कांही आपला बाणा न सोडतां अद्यापि आपल्या पूर्वस्वरूपाने प्रेक्षकांस थक्क करीत आहेत. ह्या स्थलांचे दर्शन घेतलें असतां प्रेक्षकांच्या मनावर विशेष संस्कार होऊन ऐहिक गोष्टीच्या क्षणभंगुरत्वाविषयी त्यांची चांगली खात्री पटते व शेवटी ह्या जगांत सत्कृति हीच मानवी आयुष्याचे सार्थक करणारी असून, तीच त्यास कीर्तिरूपाने चिरकाल जीवंत ठेविते असे वाटू लागते. अशा प्रकारचा उज्ज्वल प्रकाश ज्या ऐतिहासिक स्थलदर्शनाने प्राप्त होतो त्याचें माहात्म्य अधिक वर्णन काय करावे?