पान:अयोध्येचे नबाब.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लखनौ. ठिकाणी पूर्वी अयोध्येचे नबाब सिंहासनाधीश्वर होत होते त्या ठिकाणी प्रस्तुत त्यांच्या प्रतिकृति दृष्टीस पडाव्या हे केवढे चमत्कारिक स्थित्यंतर आहे ? रेसिडेन्सी. ही इमारत लखनौच्या ब्रिटिश रेसिडेंटाच्या निवासस्थानाकरितां नवाब सादतअल्लीखान ह्यानें इ० स० १८०० मध्ये बांधली असून, तिचें पूर्व स्वरूप लखनौ येथें इ० स० १८५७ साली में भयंकर बंड झाले, त्यामुळे सर्वस्वी नष्ट झाले आहे. तथापि ह्या बंडांत ब्रिटिश सेनापतींनी जे अलौकिक रणशौर्य गाजविले त्याचे उत्तम स्मारक ही रेसिडेन्सी आहे असे म्हणण्यास हरकत नाही. येथें जो घनघोर रणसंग्राम झाला, त्याची कल्पना ह्या रेसिडेन्सीच्या प्रस्तुत छिन्नविच्छिन्न स्वरूपावरून करितां येते. ही इमारत तोफांच्या हजारो गोळ्यांनी अगदी जर्जर होउन गेली आहे. तिचें प्रस्तुत भयाण स्वरूप पाहून वंडाच्या वेळची तुमुल युद्धाची उत्तम साक्ष पडते. हिच्या कोटासारख्या अजस्र भिंती अग्नियंत्रांनी सहस्रशः ठिकाणी जीर्ण होऊन गेल्या आहेत. त्यांचे प्रस्तुत स्वरूप अवलोकन केले म्हणजे त्या, लढाईमध्ये जखमी झालेल्या योद्ध्याप्रमाणे मोठ्या गर्वाने आपला पराक्रम दाखवीत आहेत असे वाटते! ह्या स्थली मत झालेल्या रणशूर आंग्लवीरांची प्रेते, जागोजाग पुरून त्यांवर स्मारकस्तंभ उभारले आहेत. सर जॉन हवलॉक, सर हेन्री लॉरेन्स वगैरेंच्या कबरीवरील स्मारकस्तंभ अत्यंत उंच असून ते त्यांच्या शौर्यातिशयाचे पोवाडे गाण्याकरितां विच्छिन्न भिंतींतून व कबरस्थानांत उगवणाऱ्या रक्तपुष्पांच्या वेलीमधून आपली गर्विष्ठ शिखरें बाहेर काढीत आहेत असे वाटते. तेथे गेलें म्हणजे मानवी देहाची क्षणभंगुरता, रणवैभवाची योग्यता, आणि धारातीर्थी मरण पावल्यामुळे शूर जनांच्या कीर्तीस आलेली तेजस्विता उत्तम प्रकारे दृष्टीस पडते. येथे एकसारखा ८६ दिवस शत्रूच्या प्रचंड सैन्याचा वेढा पडला होता; व एकसारखा तोफांचा भडिमार होत होता. तथापि त्यास हार न जातां इंग्रज लोकांनी मोठ्या धैर्याने आपला टिकाव धरिला होता. त्यांत त्यांच्यापैकी ३५० युरोपियन सोल्जर्स, ४१ लष्करी अंमलदार, व २ मुलकी अधिकारी मृत्यु पावले. परंतु