पान:अयोध्येचे नबाब.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ अयोध्येचे नबाब. [ भाग हिती दिली व अन्याय, व सार्वजनिक ३ न्यायः जनरल औट्राम हे लखनौस येण्यास निघाले त्या वेळी गव्हरनर जनरल लॉर्ड डलहौसी ह्यांनी त्यांस ता० २१ नोव्हेंबर इ० स० १८५४ रोजी एक खलिता पाठविला; आणि त्यांत कर्नल स्लीमन ह्यांनी वर्णन केलेली स्थिति अयोध्येत अद्यापि चालू आहे किंवा त्यांत काही फरक झाला आहे, ह्याची माहिती विचारली. त्याप्रमाणे जनरल औट्राम ह्यांनी ता० १५ मार्च इ० स० १८५५ रोजी अयोध्येच्या राज्यस्थितीवर एक प्रचंड रिपोर्ट पाठविला. त्यांत, मुख्यत्वेकरून, १ नबाब व त्याचा दिवाण, २ वसूल व खजिना, ३ न्यायखाते व पोलीस खातें, ४ सैन्य, ५ रस्ते व सार्वजनिक कामें, ६ गुन्ह्यांची वर्गवारी, ७ जुलूम व अन्याय, अशा सात सदरांखाली अयोध्येची सर्व माहिती दिली. त्यांतील काही काही गोष्टी वाचनीय आहेत. अयोध्येचे दिवाण अल्लीनकीखान ह्यांचा पगार वर्षाचा १,१४,००० रुपये असून त्यांना इतर देणग्या वगैरे ७ लक्ष रुपयांच्या मिळत होत्या. इ० स० १८५३ व ५४ सालचा एकंदर वसूल १,२०,००,००० रुपये जमा झाला होता; परंतु त्यांपैकी ३० किंवा ४० लक्ष लखनौस आले, बाकी सर्व प्रांतोप्रांतीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तोंडांत टाकले ! अयोध्याप्रांतांतील एकंदर न्यायखात्याचा खर्च अवघा १६,००० रुपये होता! अयोध्येच्या एकंदर सैन्याची संख्या ६०,००० होती, व त्यांचा वार्षिक खर्च ४२ लक्ष रुपये होता ! सार्वजनिक रस्ता फक्त लखनौ-कानपूर हा असून इतर सार्वजनिक इमारतीकरितां मोठमोठ्या रकमा खर्ची पडल्या होत्या! जुलूम व अन्याय ह्यांची तर सीमाच नव्हती! राज्यांतील दिवाणसाहेबापासून तो कनिष्ठ प्रतीच्या नौकरापर्यंत सर्व लांचखाऊ व अप्रामाणिक लोक होते!! तात्पर्य, ह्या रिपोर्टामध्ये कर्नल स्लीमनसाहेबांनी वर्णन केलेली सर्व स्थिति स्पष्ट रीतीनें पुनः मांडली होती.