पान:अमेरिका पथदर्शक.pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



परिशिष्ठ २


 हल्ली अमेरिकेस जपानमार्गानें व युरोप मार्गानें जाण्यास आगबोटींचें दर दरमाणशी खालीलप्रमाणें आहेत:-
 १ (अ) कलकत्ता ते हांगकांग, 'ब्रिटिश इंडिया' ( B.I.) 'आपकार' किंवा ' इंडोचायना' ह्या कंपन्यांच्या आगबोटी जातयेत असतात. 'आपकार' कंपन्याचें पहिल्या वर्गाचें भाडें ४७५ रु. व दुस-या वर्गाचें ३२० रु. 'इंडोचायना' कंपनीच्या आगबोटींत फक्त पहिल्या वर्गाच्या प्रवाशांची सोय असते.
 (ब) हांगकांग ते व्हेंकोव्हर:-( जपान वरून) : कॅनॅडियन पॅसिफिक स्टीम शिप कंपनीचें पहिल्या वर्गाचें भाडे ३७५ डालर्स : ( १०० डॉलर्स = २७५ रु. सरासरीनें ) व दुस-या वर्गाचें भाडे २१० डालर्स आहे.
 (क) हांगकांग ते सियेटेल:-(जपान वरून ) 'अॅडमिरल लाईनचें पहिंल्या वर्गाचें भाडे ३७५ डालर्स व 'निप्पन युसेन कैसा' (N.Y.K.) (Nippon Yussen Kaisa ) कंपनीचें पहिल्या वर्गाचें भाडें २७५ डालर्स आहे.
 २ (अ) मुंबई ते हांगकांग: “पेनिनशुलर अँड ओरिएंटल स्टीम शिप ' (P.&.O.) कंपनीच्या दर पंधरवड्यांत आगबोटी जातात. ह्या आगबोटींचे पहिल्या वर्गाचें भाडें ४० पौंड ( १ पौड=१५ रु. सरासरीनें ) व दुस-या वर्गाचें भाडें २२ पौंड आहे. केव्हां केव्हां 'निप्पन युसेन कैसा' कंपनीच्या बोटीहि जातात. ह्या आगबोटीचें पहिल्या वर्गाचें भाडे ४८० रु. असून दुस-या वर्गाचें भाडे २७० रु. आहे.
 (ब) कलकत्ता ते हांगकांग १ (अ) मध्यें दिल्याप्रमाणें.
 (क) कोलंबो ते हांगकांग पी. अँड ओ. किंवा 'निपन युसेन