पान:अमेरिका पथदर्शक.pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७४
अमेरिका-पथ-दर्शक.

कैसा' कंपनीच्या आगबोटींचें पहिल्या वर्गाचें भाडे ३६ पौंड व दुसऱ्या वर्गाचें २० पौंड आहे.

 (ड ) हांगकांग ते सॅनफ्रॅन्सिस्को:-( जपान हानोलुलुवरून,) ' टोयो किसेन कैसा' (T. K. K.) किंवा ' पॅनामा पासिफिक' कंपनीच्या मेल स्टीमरचे पहिल्या वर्गाचें कमीत कमी भाडे ३७५ डॉलर्स, 'टोयो किसेन कैसा' कंपनीचे दुस-या वर्गाचें कमींत कमी भाडे १८८ डालर्स आहे.

 ३ (अ) मुंबई ते इटालीच्या पूर्व पश्चिम किंवा दक्षिण समुद्र किनाऱ्यावरील कोणत्याही बंदरापर्यंत:-' लॉइड ट्रेशिनी' व ‘ मॉरिटिमा इटालियाना ' कंपन्याची जहाजें जातात. प्रवाश्यांची फार गर्दी असतें या ऋतूंत पहिल्या वगांचें भाडे ६२ पौंड व दुस-या वगांचें भाडे ५२ पौंड असून इतर ऋतूंत पहिल्या वर्गाचें भाडें ५४ पौंड व दुस-या वर्गाचें भाडें ४४ पौंड असतें.
 (ब) नेपल्स ते न्युयार्क: ' लॉईड सॅबाडो' कंपनीचे पहिल्या वर्गाचें भाडे २५० डालर्स व दुस-या वर्गाचें ४० पौंड आहे.
 ४ ' एलर मॅन ' 'बँकनाल स्टीमशिप ' कंपन्यांची जहाजें कलकत्ता किंवा कोलंबोहून न्युयॉर्क किंवा बोस्टनला केव्हा केव्हां जात असतात.

ह्यांचे दर खालील प्रमाणे:-

कलकत्ता ते न्युयार्क किंवा बोस्टन पहिल्या वर्गाचें भाडें पौंड ९०

 "    "   "         "   दुस-या   "    "  "   ७०

कोलंबो " " " पहिल्या " " " ८५

 "    "   "         "   दुसऱ्या    "   "   "   ६७

 टीप-आगबोटींच्या दरांत वेळोवेळीं फरक पडत असतो. ह्याकरितां अमेरिकेस जावयाचे झाल्यास वेळेवर दरासंबंधी व प्रवासाच्या इतर सोयीसबंधीं माहिती करितां खालील ठिकणीं पत्रव्यवहार करावा ---
     Thos. Cook & Son Ltd.
      P. O. Box 46.
       Bombay.