पान:अमेरिका पथदर्शक.pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५०
अमेरिका-पथ-दर्शक

 कोणकोणत्या पुस्तकांच्या किंमती उतरल्या आहेत हेंहि विचारून घ्यावें; म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणें पुस्तकें मागावण्यास ठीक पडेल; शिकागोंत एक दुकान आहे. त्याचा पत्ता असा--
  The book supply Co.
   266-268 Wabas Ave,
    Chicago, Ill, U. S. A.
 ह्या दुकानांत सर्व प्रकारचीं पुस्तकें मिळतात. एक पोस्टकार्ड टाकलें असतां येथील सूचीपत्र मिळूं शकतें. प्रथम सूची-पत्र मागवून किंमती पाहून घ्याव्या, नंतर त्या प्रमाणें पैसे पाठवून पुस्तकें मागवावी. एखादें मॅगेझिन मागवावयाचें झाल्यास ह्या कंपनीच्या द्वारेंच मागवावें. ह्या कंपनीच्या सूची-पत्रांत अमेरिकेंतील मॅगेझिन्सचीं नांवें व त्यांच्या किंमती दिलेल्या असतात. ज्यांच्या किंमती कमी करण्यांत आलेल्या असतील त्यांची नांवें व त्यांच्या नवीन किंमतीहि दिलेल्या असतात.
 अर्थात् पुस्तकें मागवूं इच्छिणा-या इसमानें प्रथम अमेरिकेहून सूची-पत्र मागवायास पाहिजे मॅगेझिन प्रसिद्ध करणा-याकडूनच मॅगेझिन मागवावयाचें असल्यास मात्र सूची-पत्र मागविण्याची जरूरी नाही,
 प्र० ५६--अमेरिकेंतील चांगल्या चांगल्या वर्तमान पत्रांचीं नांवें त्यांची वार्षिक वर्गणी व ती जेथे प्रसिद्ध हो होतात ती ठिकाणें इत्यादि विषयीची माहिती कळविण्याची मेहेरबानी करावी.
 उ०--हे घ्या, अमेरिकेतील चांगलीं चांगलीं वर्तमानपत्रे व मासिकें, त्यांची प्रसिद्ध होण्याचीं ठिकाणें व त्यांच्या वार्षिक वर्गणीचे दर ( वगैरे) सर्व माहिती आपणांस सांगतो:-

     मासिक
 नांव.    कीं प्रसिद्ध होण्याचीं ठिकाणें.  वार्षिक वर्गणी.
     साप्ताहिक.
Current Literature  मा New York City तीन डॉलर
        N.Y. U.S.A.   "
World's Work   मा   "     "