पान:अमेरिका पथदर्शक.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४८
अमेरिका-पथ-दर्शक

 पूर्व व उत्तर भागांतील संस्थानांत बर्फ फार पडतें. पश्र्चिम भागाच्या मध्यभागांतहि बर्फ फार पडतें. शिकागोमध्यें डिसेंबर किंवा जानेवारीमध्यें पारा -१०' ते-२०' पर्यंतहि असतो तर उलटपक्षी उन्हाळ्यांत सूर्यनारायण आपल्या प्रखर उष्णतेनें ही कसर भरून काढतात. परंतु येथें वर्षांतील बरेच महिने थंडीचे असतात, म्हणून अमेरिका हा शीत-प्रधान आहे, असें म्हणतात. न्यु इंग्लंड हें संस्थान थंडीकरितां प्रसिद्ध आहे. मध्यपश्र्चिम भागहि हिवाळ्यांत बर्फाचें आधिष्ठान बनतो. पश्र्चिमेकडील कॅलिफोर्निया व ऑरेगान ह्याच संस्थानांत थंडी फारशी नसते. उत्तर पूर्व भागांत मात्र थंडी अतीशय असते.

 परंतु हवा कोरडी राहत असल्यामुळे हिंवाळ्यांत अन्नाला बरीच रुचि असते. येथील हवापाणी गुणकारी आहे. थंडीचें नांव ऐकून कोणी भिऊन जाऊं नये. मी शिकागोंत राहिलों आहे. रात्रीं बारा वाजतां ऐन थंडीच्या भरांतहि स्केटींगचा खेळ पहाण्यास मी जात असे. असें करतांना मला फार मौज वाटत असें. ह्यासमयीं चेह-याशिवाय दुसरा कोणताहि दुसरा शरीराचा भाग उघडा ठेवतां येत नाही. सर्व शरीर झांकलेलें असतें. हिंवाळ्यांत जमीनीवर सांचलेल्या बर्फावर चांदण्यारात्रीं अमेरिकन युवक व युवति स्केटींगचा खेळ खेळतात, तेव्हां फार मौज वाटते. सारांश, अमेरिकेची हवा निरोगी असून बलवर्धक आहे.

 प्र०--अमेरिकेंत असलले शीख लोक तेथें काय करीत असतात ?

 उ०--अमेरिकेत जाणा-या हिंदी लोकांत पंजाबच्या रहिवाश्यांचा बराच भरणा असतो. ह्याचें कारण, असें कीं, हाच प्रांत सोवळ्या ओंवळ्याच्या कल्पनांपासून मुक्त आहे. हे पंजाबी शीख मजुरी करितात. ह्यापैकीं कांहीं लोक लांकडे कापण्याच्या गिरण्यांतूनही कामें करितात. बरेच लोक शेतक-यांकडे नोकर असतात. बरेच शीख लोखंडाच्या खाणीत कामावर असतात. कांहीं शीख उन्हाळ्यांत फळांच्या बागेंत काम करतात व बाकीच्या दिवसांत घरीं स्वस्थ बसून असतात. कांहीं शीखांनी जमीनी खरेदी केल्या असून ते तेथें सहकुटुंब राहत असतात.

 परंतु दुःखाची गोष्ट ही कीं, शिकलेले हिंदी लोक तेथें जात नाहीत. ज्यांना व्यापार कसा करावा, हें मुळींच माहीत नाही, ते लोक तेथें व्यापार करण्याकरितां जातात.ह्यामुळे त्यांना चांगला फायदा होऊं शकत नाही. आमच्या