पान:अमेरिका पथदर्शक.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४७
प्रश्र्नोत्तरें.

शिक्षण घेत आहेत. कृषि शिक्षण मिळवणा-यांनी ह्या विश्र्वविद्यालयाच्या रजिष्ट्रारला लिहून प्रथमपासूनच सर्व विचारपूस करून घ्यावी.
 प्रत्येक संस्थानच्या विश्र्वविद्यालयांत कृषि शिकविण्याची व्यवस्था आहे. आमचे विद्यार्थी बंधू ज्या संस्थानांत जातील, तेथें त्यांस विश्र्वविद्यालय आढळेल. व त्यांत त्यांना त्यांच्या अभिरुचिनुसार विद्याभ्यास करतां येईल. सर्वच संस्थानांत उत्तम उत्तम युनिव्हर्सिट्या आहेत. परंतु कृषिशिक्षणाकरितां पश्र्चिम भागांतील संस्थांनांत जाणें उचित आहे. कारण हा भाग कृषीचें माहेरघरच आहे व ह्या भागांतील हवाहि विशेष थंड नाहीं.
 प्र० ५०--कृषिसंबंधी सूचना मागवावयाच्या असल्यास कोणाशीं पत्रव्यवहार करावा ?
 उ०--वाशिंग्टन डी. सी. शहरामध्यें एक मोठा सरकारी कृषि विभाग आहे. त्या विभागातर्फे एक डायरेक्टरी छापली जाते. अमेरिकन यंत्रांचा कॅटलागहि Director of the Interior ला लिहिल्यानें मिळूं शकतो. ज्यांना कृषिसंबंधी कांहीं माहिती विचारावयाची असेल त्यांनीं
 The Director,
  Agricultural Department
   Washington D. C. U. S. A.
ह्या पत्त्यावर विचारपूस केल्यास त्यांना योग्य सूचना मिळं शकतील.
 प्र० ५१--कॅलिफोर्निया संस्थान पश्र्चिम भागांत आहे. ह्या संस्थानांतील हवा पाणी कसें आहे? अमेरिकेच्या इतर भागांचेहि हवापाणी कसें काय आहे, हें सांगण्याची कृपा करावी.
 उ०--कॅलिफोर्नियाची हवा फार थंड नाहीं. त्यावरून तेथें थंडीच नसतें असें अनुमान करणें चुकीचें होईल. कारण हिंवाळ्यांत तेथेंहि बरीच थंडी असते. कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागांत बर्फहि पडतें. परंतु दक्षिण भागांतील हवा कांहीं अंशीं पंजाबच्या हवेप्रमाणें आहे. ऑरेगान संस्थानांतहि फार थंडी नसते. दक्षिणकडील संस्थानांत केवळ नांवालाच बर्फ पडतें. तेथें उष्णताहि बरीच असते. ऑरेगान व कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडील कांहीं भागांत उन्हाळ्यांत फारच उकडतें.