पान:अमेरिका पथदर्शक.pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९
प्रश्र्नोत्तरें.

सर्व ऋतु सारखेच आहेत. जे लोक विद्यार्जनाकरितां जाऊं इच्छितात व ज्यांचे जवळ खर्चण्याला पुरेसें द्रव्य असतें त्यांनी आगस्टच्या पूर्वीच येथून निघावें, म्हणजे सप्तेंबरमध्ये अधिवेशनाला सुरवात होण्यापूर्वी तेथें जाऊन पोहोंचतां येईल. कारण, अमेरिकन युनिव्हर्सिट्यांचा वर्षारंभ सप्तेंबर अखेरपासून होतो. ज्यांना दुस-या सहामाहीत अभ्यासास सुरवात करावयाची आहे, त्यांनीं येथून डिसेंबरमध्यें निघून तेथें जानेवारीत पोहोंचलें पाहिजे. परंतु असें करणें योग्य नाही. वर्षारंभापासूनच युनिव्हर्सिटीत दाखल होणें विशेष सोईचें असतें.
 ज्यांना शिकागो विश्वविद्यालयांत प्रवेश हवा असेल,त्यांनीं येथून नोव्होंबर, मे, किंवा आगष्टमध्ये प्रवासास आरंभ करावा, कारण,तेथें त्रैमासिक अधिवेशनाची ( Quarter Session system) पद्धति अमलांत आहे. दर तिमाहीला तेथील अभ्यासपत्रक बदलतें; व बाराही महिने अभ्यास सुरू असतो. धनवान विद्यार्थी हव्या त्या दिवसांत तेथें जाऊं शकतात.
 जे विद्यार्थी स्वावलंबन करून विद्यार्जन करूं इच्छितात, त्यांनीं एप्रीलमध्येंच येथून जावे. ह्या योगानें मे मध्यें तेथें पोहोंचून कामाचा तपास करून द्रव्यार्जन करण्यास सुरुवात करतां येईल व सप्तेंबरपर्यंत द्रव्य मिळवून, नंतर विश्वविद्यालयांत दाखल होतां येईल. ह्या काळांत चार पांचशे रुपये सहज कामावितां येतील. असे केल्यास त्यांना अभ्यास करणे सोयीचें होईल. कारण उन्हाळ्याचे दिवसांतच अमेरिकेंत द्रव्यार्जन करतां येतें. जे केवळ मजुरीकरितां तेथें जातात, त्यानींहि एप्रीलमध्यें तेथें जावें. कारण उन्हाळ्यांत तेथें काम अधिक मिळते, व काम करीत असतांच अमेरिकन लोकांच्या रीतीरिवाजांशी परिचय करून घेतां येईल. हिवाळ्यांत त्यांना काम न मिळालें, तरी ते उपाशी खास राहणार नाहीत. दुसरी गोष्ट ही की, उन्हाळ्यांत खर्च कमी येतो व ही वेळहि आपलयाला सोईची अशीच असते. ह्या दिवसांत इकडे तिकडे फिरून प्रत्येक इसमाला त्याच्या पसंतीसारखे कायमचे काम मिळवितां येईल. व्यापारउदीमाकरितां जाऊं इच्छिणाऱ्यांनी येथून आक्टोबरमध्यें जाणें योग्य होईल. कारण हिवाळ्यांत सर्व व्यापारी मालाच्या हंगामामुळे आपआपल्या ठिकाणीं असतात. त्यावेळी त्यांची भेट घेणें व देणें घेणें ठरविणें हिंदी व्यापा-यांस बरें पडतें. हिवाळ्याच्या दिवसांतच परदेशी व्यापारी अमेरिकेस जात असतात. ह्याच दिवसांत सर्व प्रकारच्या मालाचा घाऊक व्यापार तेथें घडत