पान:अभिव्यक्ती.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२/ अभिव्यक्ती

 'पुराणा' ने दिलेला तपशील (व्यक्तींचा, घटनांचा, प्रसंगांचा आणि मानवी जीवनमूल्यांचा) कलांतर्गत न्यायाने कायम ठेवून कलाकृतीची बांधणी, उभारणी करणे म्हणजेच पौराणिक सत्याची जपवणूक आहे, असे म्हणता येईल. अर्थात या- नंतरही कलावंत लेखकाला भरपूर वाव आणि अवसर असतोच. पौराणिक व्यक्तींशी, कथाभागांशी, घटना प्रसंगांशी, जीवनचिंतनाशी समरस झालेल्या कलावंताला हे सारे जाणवतच असते. अनेक दृष्टीने ऐतिहासिक कृतीपेक्षा पौराणिक कृतीत अशी स्थाने कितीतरी प्रमाणात अधिक असतात. असा 'मुग्ध प्रदेश ' ( area of silence ) किंवा 'मौन-क्षेत्र' पुराणात भरपूर प्रमाणात असते. इतिहास पुराण जिथे हे मौन पाळते तिथे कलावंताला बोलावे लागते. कच्चे दुवे सांधावे लागतात, विलग भाग सलग करावे लागतात, अंतर (gaps) भरून काढावे लागते, व्यक्तींच्या व्यक्तित्वाचे गाभे शोधावे लागतात, क्वचित प्रसंगी कथानकाची, व्यक्तींचीही नव्याने उभारणी करावी लागते. नुसत्या वरवरच्या आधाराने, रूपकाने नवी कथाही घडवावी असे त्याला वाटू लागते.
पौराणिकता आणि ऐतिहासिकता यांत महत्त्वांचा भेद दिसतो तो हा की  इतिहासाच्याही पलीकडील म्हणजे प्राक्ऐतिहासिक काळ म्हणजे पुराणकाळ मानावा लागतो. इतिहाकालांच्याही पलीकडे पुराणकाळ उभा असतो. म्हणजे या पुराणकाळापासून इतिहासकाळापेक्षा आपण सुदूर असतो. इतिहासअसतो, इतिहास बऱ्याच अंशी झालेला असतो. क्वचित अनुमानावर अवलंबून राहा-अलीकडचा असून त्या इतिवृत्ताला पुराव्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्नही चाललेलाण्याची पाळी येते. पुराणकाळाचे दूरत्व तर स्पष्ट आहेच पण त्यापेक्षाही अस्पष्टता, धूसरता, स्थूलपणा आणि ढोबळपणा हेही पुराणांचे विशेष म्हणून सांगता येतील.पुराणांच्या संदर्भात पुरावे देण्याची आणि उपलब्ध होण्याची फारशी सोय नसते.एवढे मान्नं निश्चित की सर्वांना ज्ञात अशी एक पुराणकथा असते. भारतीय संस्कृती-चेच ते वैशिष्ट्य आहे. तेव्हा या ज्ञात सत्याला, अर्थात केवळ परंपरेतून वा रूढीतूनसिद्ध झालेले नाही तर जनसामान्यापर्यंत ढोबळं स्वरूपात ते येऊन पोहोचलेले असतेहे ज्ञात'  पौराणिक सत्य, या सत्याची बूज पौराणिक कलाकृती. निर्मात्यांनी कला-व्यवहाराच्या नियमानुसार राखणे केवळ इष्ट नव्हे तर आवश्यक आहे असेपौराणिक साहित्याचे वेगळेपणनेमके काय ? याबद्दल वाद वा मतभेद होण्याची शक्यता आहे. पौराणिक कथाशेवटी कलावंताला जशी प्रतिभासीत होते तशीच अभिव्यक्त करणे महत्त्वाचे ठरते. जर ती पौराणिक सत्याला धरून निर्माण झाली नसेल तर मग अयशस्वी किंवा