पान:अभिवादन (Abhivadan).pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


५६ । अभिवादनधार्मिक तत्त्वज्ञाना मागे सामाजिक आशय असतो, सामाजिक गरजांचा संदर्भ असतो हे विचारात घेतल्यानंतर प्रो. कोसंवींची मते पुराव्यांनी कुठवर पटतात, कुठवर पटत नाहीत हे पाहणेच आपल्या हाती राहते. या भगवद्गीता परिचयाच्या निमित्ताने त्या श्रेष्ठ विचारवंताला आदरांजली वाहण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे इकडे या लेखाच्या आरंभी लक्ष वेधलेले आहेच.