पान:अभियांत्रिकी.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी: (१) निवडलेल्या विट बांधकामासाठी लागणारे साहित्य जमा करून ठेवा. (विटा, वाळू, सिमेंट, खडी इ.) (२) ज्या ठिकाणी आपणास गांडुळखत बेड बांधायचा आहे त्याठिकाणी लागणारे साहित्य व मटेरिअल अगोदार आणून ठेवावे. बेड बांधणीची जागा निश्चिती करून त्या ठिकाणी पाया खोदून ठेवावा. उपक्रमासाठी लागणारी साधने व हत्यारे उपलब्ध करून ठेवा (मीटरटेप, दोरी, ओळंबा, गुण्या, लेव्हलट्यूब, हातोडी, थापी, घमेले, रंधा, बादली, टिकाव, खोरे इ.) इतर बांधकाम मिळाल्यास त्यांची पूर्वतयारी वरीलप्रमाणे करावी. त्याचा अंदाजे खर्च ठरवून मटेरिअल खरेदी करावे. उपक्रमांची निवड (१) गांडुळखतासाठी बेड बांधणे. (२) शाळेतील किंवा गावातील एखादे भिंत बांधकाम करणे. (३) झाडांसाठी अथवा बागेत कट्टा बांधकाम करणे. (४) कंपाऊंड भिंत बांधणे. रूमचे विट बांधकामाच्या साहाय्याने पार्टिशन करणे, (६) पाणी साठवणीसाठी टाकी तयार करणे. (७) विटांची कचराकुंडी तयार करणे, (८) केलेल्या बांधकामाचे बजेट तयार करणे. (९) रूम बांधकाम करणे. (१०) शाळेचे संडास, मुतारीचे विट बांधकाम करणे. अपेक्षित कौशल्ये : (१) मॉर्टर तयार करता येणे (योग्य प्रमाण). (२) मॉर्टरचा थर देता येणे. वीट बांधकाम करता येणे (लेव्हलमध्ये). (४) क्युअरींगचे ज्ञान असणे. (५) क्युअरिंग करणे. (६) कामाचे Planning&Budget ठरवता येणे, (७) दोरी, ओळंबा, लेव्हलट्यूब यांचा योग्य वापर करता येणे. शिक्षक कृती : (१) मॉर्टरविषयी माहिती द्या. (२) अंदाजपत्रक कसे तयार करावे हे सांगा. (३) विटांच्या वेगवेगळ्या बाँडमध्ये बांधकाम दाखवा.