पान:अभियांत्रिकी.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षता : (१) हॅक सॉमधील ब्लेड व्यवस्थित ताणले असल्याची खात्री करा. (२) ब्लेडच्या दातांची दिशा पुढे झुकलेली असल्याची खात्री करा. (३) कापणे चालू असताना मधूनमधून ब्लेडवर पाणी टाका. (४) कापकाम करताना ब्लेडची पूर्ण लांबी वापरा. (५) घासकाम करण्यापूर्वी कानशीला खडू लावा. (६) आवश्यकतेनुसार रफ आणि स्मूथ फाईलचा वापर करा. (७) फाईलिंग करताना फाईलची पूर्ण लांबी वापरा. (८) छिद्र पाडताना मशीन व्हाईस व त्यामधील जॉब घट्ट पकडून ठेवा. (९) छिद्र पाडताना मधूनमधून जॉबवर पाणी टाका. (१०) टॅपरेंचमध्ये १,२ व ३ क्रमाने एकेक टॅप वापरा. (११) आटे पाडत असताना टॅप तुकड्याच्या पृष्ठभागाला काटकोनात राहील याची काळजी घ्या. (१२) आटे पाडत असताना मधूनमधून ऑईल सोडा. (१३) डायस्टॉकमध्ये डाय योग्य प्रकारे बसवा. शिक्षक कृती: (१) कापकाम करताना कसे उभे राहावे, कसे कापावे इत्यादी कौशल्ये शिकवा. (२) कापकाम करतानाची फ्रेमवरील पकड कशी असावी ते सांगा. घासकाम करतानाची कानशीवरील पकड कशी असावी ते सांगा. मोजमापाची साधने इतर हत्यारांपासून वेगळी का ठेवावीत ते सांगा. (५) टॅपिंग करण्यापूर्वी पाडावयाचे छिद्र टॅपपेक्षा थोडे कमी व्यासाचे का ठेवावे लागते ते समजावून सांगा. आटे पाडताना टॅप आणि डाय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा विरुद्ध दिशेने मागे का फिरवावा लागतो ते सांगा. (७) पाईपवर आटे कसे पाडतात ते सांगा. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका - V1, इयत्ता ९वी. (४) दिवस : नववा प्रात्यक्षिकाचे नाव : बांधकाम - वीट बांधकाम करणे. प्रस्तावना: मागील प्रात्यक्षिकामध्ये आपण विटांचे प्रकार, विविध बाँडची ओळख, एका बाँडचे प्रत्यक्ष बांधकाम केलेले आहे. त्याचबरोबर साधने व हत्यारांचा वापर कसा करतात हे शिकलो. नवीन बांधकाम चालू असलेल्या ठिकाणाला भेट दिलेली आहे. बांधकामचे Plan, Elevantion, Side View समजावून घेतलेले आहेत. आपण या प्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष वीट बांधकाम करून एक उपक्रम पूर्ण करणार आहोत. उदा. व्हर्मीकंपोस्ट बेड बांधणे. नवीन कामाचे Planning Budget ठरवणार आहोत. ६५