पान:अभियांत्रिकी.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) हे तंत्र वापरून कंपाऊंडसाठी पोल कसे बनवता येतील ते सांगा. आपणास हे माहीत आहे का? (१) ओळंब्याच्या वजनामुळे ओळंब्याची दोरी जमीन पातळीस काटकोनात राहते. (२) सिमेंट, वाळू आणि खडी यांच्या मिळणास काँक्रीट म्हणतात. मशीनची फाऊंडेशन, आर.सी.सी. कॉलम करण्यासाठी काँक्रीट वापरतात. मशीन फाऊंडेशनसाठी या मिश्रणाचे प्रमाण १:४:८ घेतात, तर आर.सी.सी. कॉलमसाठी हे प्रमाण २:३:६ असे घेतात. आर.सी.सी. म्हणजे रेनफोर्ल्ड सिमेंट काँक्रीट. यामध्ये लोखंडाचा वापर केलेला असतो. जेव्हा काँक्रीटमध्ये लोखंड वापरत नाहीत तेव्हा त्यास पी.सी.सी. म्हणजे प्लेन सिमेंट काँक्रीट म्हणतात. (४) आर.सी.सी. स्ट्रक्चरसाठी पिळाचे म्हणजे टार्शन बार वापरतात. त्यामुळे सिमेंटची गजावरील पकड घट्ट होते. राऊंड बार लवचिक असल्याने त्यांचा वापर चौकोनी फ्रेमसाठी करतात. (५) आर.सी.सी. स्ट्रक्चरसाठी ८,१०,१२ व १६ मि.मी. जाडीचे बार व ६मि.मी. जाडीचे राऊंड बार वापरतात. (६) आर.सी.सी.च्या उभ्या स्ट्रक्चरला कॉलम म्हणतात. कॉलमची रचना दाब सहन करण्यासाठी केलेली असते, तर आडव्या स्ट्रक्चरला बिम म्हणतात. बिमची रचना ताण सहन करण्यासाठी केलेली असते. (७) एका कॉलमवर दुसरा कॉलम उभा करावयाचा असेल, तर पहिल्या कॉलमचे गज दुसऱ्या कॉलममध्ये गुंतवण्यासाठी गजाच्या जाडीच्या ४८ पट इतके बाहेर ठेवावेत. (८) आर.सी.सी. स्ट्रक्चरची मजुरी रनिंग फुटावर आकारली जाते. स्वाध्याय: (१) जॉब करताना केलेल्या कृतीचा फ्लो चार्ट तयार करा. (२) काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाययोजना लिहा. (३) कॉलमसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा बाजारभाव पहा. (४) वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत, मजुरी, अप्रत्यक्ष खर्च इ.च्या आधारे कॉलमची किंमत काढा. (५) कॉलमची लांबी, रुंदी व जाडी मोजा आणि त्यावरून त्याचे घनफळ काढा. त्यानुसार १ घनमीटर कामासाठी लागणारे साहित्य ठरवा. फ्लो चार्ट (FlowChart): ६ mm. रींग चौकट हॅक साँ वेल्डींग मशीन रॉड सांगाडा साचा टॉर्शन बार ................. रॉड साईज............... रॉड सांगाडा ............. रॉड सांगाडा कापणे वेल्डींग ठेवणे क्युअरिंग काढणे टाकले R.C.C.. ... R.C.C... कॉलम कॉलम कॉलम कॉलम ओले बारदान साचा २ तास पाणी काँक्रीट T-पाणी ... R.C.C. क्युअरिंग कोरडे मिश्रण -सिमेंट +-वाळू ५-खडी