पान:अभियांत्रिकी.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साहित्य : टॉर्शन बार, राऊंड बार, बाईंडिंग वायर, लाकडी फळ्या, खिळे, सिमेंट, वाळू, खडी, पाणी इ. साधने : ऐरण, मेझरिंग टेप, गुण्या, चाळणी, घमेले, बादली, बारदान इ. हत्यारे : छिन्नी, क्लॉ हॅमर, पक्कड,खोरे,थापी,ओळंबा इ. कृती: (१) टॉर्शन बारचे चार तुकडे दिलेल्या मापात छिन्नीने तोडून घ्या. (२) राऊंड बारचे चौकोनी फ्रेमच्या चौकोनी रींग - संख्येइतके तुकडे दिलेल्या मापात टॉर्शन बार - छिन्नीने तोडून घ्या. (३) नंतर राऊंड बार काटकोनात वाकवून चौकोनी फ्रेम तयार करा. (४) या चौकोनी फ्रेम प्रत्येकी १९ ते २० सें.मी. अंतरावर टॉर्शन बारना बाईंडिंग वायरने बांधून घ्या. (५) चार लाकडी फळ्या एकमेकींना काटकोनात उभ्या जोडून साचा तयार करा. (६) लोखंडी पत्र्यावर खडी, चाळलेली वाळू, सिमेंट आणि पाणी टाकून काँक्रीट तयार करा. (७) सपाट जागेवर लाकडी साचा उभा करून त्याच्या तळाशी थोडे काँक्रीट टाका. (८) साचाच्या मधोमध गजांचा सांगाडा उभारा. (९) मग कॉलम पूर्ण भरेपर्यंत साच्यात थोडे थोडे काँक्रीट ओतत रहा. (१०) दुसऱ्या दिवशी कॉलमच्या फळ्या काढून घ्या. (११)तयार झालेल्या कॉलमवर बारदान गुंडाळून त्यावर २८ दिवस पाणी मारा. दक्षता : (१) टॉर्शन बारचे तुकडे कॉलम उंचीपेक्षा १० ते १५ सेमी ठेवा. (२) राऊंड बारची चौकोनी फ्रेम तयार करताना गजाचा जोड (हुक) मधोमध ठेवा. (३) हुकच्या जागी दोन्ही गज २ ते ३ सेमी एकमेकांवर येतील असे पहा. (४) टॉर्शन बार चौकोनी फ्रेमच्या आत ठेवा. (५) सांगाडा बांधताना फ्रेमचे जोड वेगवेगळ्या बाजूला येवूद्यात. (६) कव्हरिंगसाठी फळ्यांचा साचा सांगाड्यापेक्षा २ ते ४ सेमी. मोठा ठेवा. (७) ओळंबा लावून साच्याचा काटकोन तपासून पहा. (८) साचा आडवा भरायचा असल्यास तीनच लाकडी फळ्या वापरा. (९) काँक्रीट तयार करताना प्रथम खडी, वाळू आणि सिमेंट खोऱ्याने चांगले कालवून नंतर पाणी टाका. (१०) सुरुवातीला सांगाडा काँक्रीटमध्ये दाबून बसवा. (११) काँक्रीट ओतताना गजाने मधून मधून घोळत रहा. (१२) साचाच्या फळ्या कॉलमच्या कोपऱ्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. शिक्षक कृती: (१) चौकोनी फ्रेमसाठी बार कसा वाकवतात ते शिकवा. (२) गजांचा सांगाडा कसा बांधतात ते दाखवा. (३) काँक्रीट कसे तयार करावे ते शिकवा. (४) काँक्रीट तयार करताना खाली लोखंडी पत्रा का घ्यावा ते सांगा. (५) ओळंबा कसा वापरतात ते शिकवा. (६) कॉलममध्ये काँक्रीट कसे भरतात ते शिकवा. (७) टॉर्शन बार कॉलमच्या बाहेर का ठेवतात ते सांगा.... ६१