पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/371

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असावेत, मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सर्व देशांनी आपल्या शेजारच्या राष्ट्रांशी असलेली प्रादेशिक भांडणे एकदा मिटवून टाकून जगभर शांतता निर्माण करावी, या हेतूंबद्दल फारसा मतभेद नाही. क्लिंटन ज्या तऱ्हेने सरसकट जगभर सगळ्या राष्ट्रांना नाराज करीत आहेत त्याने त्यांचा हेतू साध्य होईल, की त्यांच्या उद्दिष्टांचा पराभव होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सोविएत युनियन बुडाले, अमेरिकेशी तूल्यबळ महासत्ता कोणी उरली नाही म्हणून काय झाले? भारताचे पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वागवतात, तसे राष्ट्रप्रमुखांना वागवणे अमेरिकन अध्यक्षांना झेपणारे नाही.
 गुलामांच्या प्रश्नांवरती अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धाचा धोका स्वीकारला; पण दक्षिणेतील राज्यांचा पराभव झाल्यानंतर उदारता आणि दिलदारपणा असा दाखवला, की सगळे अमेरिकन राष्ट्र पुन्हा एकसंघ बनले. रशियाच्या पाडावानंतर क्लिंटन यांच्यावर येऊन पडलेली जबाबदारी लिंकन यांच्याप्रमाणेच ऐतिहासिक आहे. दुर्दैव असे, की आजचे अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनच्या बालपणातल्या कथेचा आदर्श समोर ठेवत आहेत. प्रौढ अब्राहम लिंकनचा नाही, त्यांनी आदर्श जॉर्ज वॉशिंग्टनचा बालपणाचा न ठेवता 'जेटीसबर्ग'च्या लिंकनचा ठेवला पाहिजे.

(१७ फेब्रुवारी १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३७२