पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/325

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






लोकसंख्या वाढविषयक परिषदेत नोकरशाहीचा विजय


 'इजिप्तची राजधानी कैरो' जगभर फिरणाऱ्या प्रवाशांच्या तांड्यांचे लोकप्रिय आकर्षण नाईल नदीच्या काठच्या अतिप्राचीन संस्कृतीच्या पिरॅमिड्स आणि स्पिन्वसारख्या आजही विस्मय वाटावा अशा प्रचंड अवशेषांचा प्रदेश. त्याशिवाय कैरोची प्रसिद्धी तेथील गालिच्यांच्या बाजाराबद्दल आहे. आपसासच्या प्रदेशात तयार होणारे नाहीत; पण प्रचंड संख्येने प्रवासी तेथे जमत असल्याने गालिच्यांचा बाजार वर्षभर जोरात चालू असतो; पण कैरो बाजारपेठेची प्रसिद्धी गालिच्यांपेक्षा किमतीवर घातल्या जाणाऱ्या हुज्जतीसंबंधी आहे. दुकानदाराने ग्राहकाला आवडलेल्या गालिच्याची किमत सुरुवातीसच दहा हजार डॉलर सांगितली, की ग्राहक तोच गालिचा पाचशे हजार डॉलरना मागतो. मग दोन्ही बाजू हुज्जत घालत घालत अखेरची किमत ठरवतात. गिऱ्हाईक वस्ताद असेल तर दीड-दोन हजारात चांगला गालिचा पदरात पाडून घेतो. गिऱ्हाईक नवखे, संकोची असेल तर त्याच गालिच्याला आठ-नऊ हजार डॉलर देते, वर दुकानदाराचे "साहेब, आपण तर गालिच्याचे मोठे जाणकार निघाले; माझ्याकडचा सगळ्यांत चांगला गालिचा आपण बरोबर टिपला. किमत इतकी कमी ठरविली, की की तर ठार बुडालो." असली वक्तव्ये ऐकून हलक्या खिशामुळे मनावर आलेला बोझ सावरत जातो. गिऱ्हाईक पक्के असले काय आणि कच्चे असले काय, मिळालेल्या गालिच्याची खरीखुरी किमत कदाचित पाचशे डॉलरही नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गालिच्याच्या गुणवत्तेचे जाणकार फार थोडे आणि जमणारे प्रवासी पैसेवाले. एकतरी गालिचा कैरो भेटीची निशाणी म्हणून परत घेऊन जाण्याच्या निश्चयाने आलेले असे व्यापारी, असे ग्राहक. त्यामुळे कैरोच्या बाजारातील

अन्वयार्थ - एक / ३२६