पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/252

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ॲटमबॉम्ब चोर-बाजारात
 साहजिकच, बड्या घरची सारी वैभवाची चिन्हे गुजराण चालविण्यासाठी बाजारात येत आहेत. हिरव्या पाचूंच्या खाणीबद्दल रशियाची प्रसिद्धी आहे. खाणीच्या कामगारांनीच चोरून ठेवलेले अमोल पाचू पश्चिमी देशांच्या बाजारात चोरीछुपे येऊ लागले आहेत. सोविएत संघाची वैभवाच्या काळांतली आर्थिक ताकद खरोखरची किती होती, याबद्दल मतभेद असू शकतात; पण ते राष्ट्र लष्करीदृष्ट्या महासामर्थ्यवान होते यात कोणाला शंका नाही. लष्करी शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या ग्रुप कारखान्यांत शास्त्रज्ञांना आज १०० डॉलरसुद्धा पगार मिळत नाही. हे सगळे शास्त्रज्ञ आणि कुशल कारागीर कारखान्यात तयार होणारी सर्व प्रकारची शस्त्रे कोणाही ग्राहकाला जागतिक किमतीच्या तुलनेने अगदी स्वस्तात विकायला तयार आहेत.
 MIG-29 सारखी लढाऊ विमाने खासगीत तेथे विकली जातत. अतिरेक्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या AK-47, AK-57 अशा बंदुकांची सर्रास विक्री चालू आहे. एवढेच नव्हे तर, ॲटमबॉम्ब तयार करण्याकरिता लागणारे प्लुटोनियम - रेडिअमदेखील या भंगार बाजारात सहजपणे उपलब्ध होऊ शकते.
 कटू सत्याचा वक्ता दुर्मीळ
 रशियन नागरिकांचा स्वाभिमान कमालीचा दुखावला गेला आहे; पण अर्थकारणात खोटेपणाला आणि लटपटपंचीला वाव नाही. काय पडतील ते कष्ट सोसून रशियन लोकांची उत्पादकता वाढविल्याखेरीज आणि रशियज मालाची गुणवत्ता सुधारण्याखेरीज आजच्या अरिष्टातून निघण्याचा दुसरा काही मार्ग नाही; पण हे अप्रिय सत्य लोकांना पटावे कसे? आणि पटवून सांगावे कुणी?
 ठाकरे-जॉर्ज फर्नाडिस युती

 भारतासारख्या देशातदेखील हे काम कठीण आहे. "आमचे कारखानदार चोरून आणलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने निराधार ग्राहकाला लुटतात; हिंदुस्थानात उद्योजक कारखानदार कोणी नाहीच; ५० वर्षे संरक्षणाच्या प्रचंड भिंतींच्या आड लपून गब्बर झालेली मंडळी सपाट मैदानाची, एवढेच नव्हे तर खास सोयीसवलतीची व संरक्षणाची मागणी करीत आहेत; येथे उद्योजक कोणी नाही; येथे कोणी शस्त्रज्ञ नाही." असे म्हटले तर लोक मोठे दुखावतात आणि राष्ट्राभिमानाचा खोटा आव आणून, आवाज चढवून बोलू लागतात. हिंदुस्थानसारख्या सर्वमान्य मागासलेल्या देशात लोकांची ही स्थिती, तर रशियातील लोकांना असली भाषा

अन्वयार्थ - एक / २५३