पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/249

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अनभ्यस्त, अप्रस्तुत, संदर्भरहित
 शेतकऱ्यांना बी महाग मिळेल काय? औषधे महाग होतील काय? असले अप्रस्तुत प्रश्न एकामागोमाग एक घेतले जातात आणि प्रत्येक प्रश्नावरील चर्चेच्या वेळी मुलाखती घेतलेल्या सर्वांची धावती परेड दाखवली जाते. कोणालाही पुरे बोलू दिले जात नाही. तास दीड तास मुलाखत दिलेल्यांच्या लक्षात येते, की मुलाखतीतील फार तर १५-२० सेकंदांचाच तुकडा वापरला गेलेला आहे आणि तुकडाही असा, की ज्याचा मुलाखतीच्या आत्म्याशी दुरान्वयेही संबंध नाही.
 'इंडिया टुडे' या पाक्षिकाचे एक टीव्ही मासिक 'न्यूज ट्रॅक' म्हणून निघत असे. हिंदुस्थानात इतर कोणत्याही टीव्ही मासिकापेक्षा त्याचा खप जास्त होता. एकूण चार वेळा माझ्या पूर्ण मुलाखती न्यूज ट्रॅकच्या पत्रकारांनी घेतल्या आणि काही ना काही कारणांनी त्या कपाटातच ठेवल्या. मला कारण कळवण्याचा शिष्टाचार संपादकांनी पाळला नव्हता. मीही माझ्या काळ्या यादीत 'न्यूज ट्रॅक'चे नाव घेतले आणि स्वस्थ राहिलो. १५ एप्रिल, 'मॅराकेरा' येथे गॅट करारावर सही करण्याचा ठरलेला मुहूर्त. तेव्हा सगळीकडे डंकेल विषयावर कार्यक्रम करण्याविषयी धावपळ चालू झाली. 'न्यूज ट्रॅक'ची मंडळी पुन्हा एकदा दूरदर्शनच्या झेंड्याखाली आंबेठाणला आली. त्यांना मुलाखत न देण्याचा माझा निर्णय सांगितल्यावर त्यांनी दिल्लीहून फोन करून, मुख्य संपादकाशी बोलणे करून दिले, मुख्य संपादकांनी माफी मागितली. 'न्यूज ट्रॅक'चे नाव काळ्या यादीतून तात्पुरते का होईना मी दूर केले.
 माझेही काही हक्क आणि अधिकार
 आता प्रश्न आला मुलाखतीच्या स्वरूपाचा. मुलाखतीला बसण्याआधी मी आग्रह धरला तुमच्या कार्यक्रमाचा आराखडा काय? नेमके कोणते मुद्दे तुम्ही चर्चेला घेणार आहात, त्यांतील प्रस्तुत किती, अप्रस्तुत किती? महत्त्वाचे मुद्दे कोणते? यासंबंधी आराखड्यात बदल सुचवण्याचा माझा अधिकार आहे. कोणत्याही वावदूक प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात मला स्वारस्य नाही.

 एवढेच नाही, माझ्या मुलाखतीपैकी कोणता भाग वापरला जाणार आहे? हे मला स्पष्ट झाले पाहिजे. सगळीच सगळी मुलाखत वापरता येणार नाही हे मी समजू शकतो; पण कोणते तुकडे कसे वापरले जात आहेत आणि ते तुकडे माझ्या विचाराचे प्रातिनिधिक आहेत किंवा नाहीत हे तपासण्याचा अधिकार मला असला पाहिजे. 'न्यूज ट्रॅक' व्यवसाय आहे, लोकांकडून विनामोबदला तास दोन तासाचे चित्रण घ्यायचे आणि त्याची मनमानी वासलात लावायची हे

अन्वयार्थ - एक / २५०