पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






मतिमंद मुलीवरील शस्त्रक्रियासंबंधी वाद नको होता


 स्पितळातील एक शल्यचिकित्सागृह. गंभीर अवस्थेत असलेला रोगी टेबलावर शल्य शस्त्रक्रियेसाठी ठेवण्यात आला आहे. प्रमुख डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संच निर्जंतुक हिरवे झगे घालून हातात मोजे चढवून सज्ज झाला आहे. दरवाजाबाहेर चिंताग्रस्त नातेवाईक एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांतली एक तरुण मुलगी सर्व संकोच सोडून डोळ्यातील पाण्याला वाट करून देत आहे.
 शल्यचिकित्सा सुरू करण्यासाठी डॉक्टरांनी पहिली सुरी उचलली आणि ते पहिला छेद घेणार एवढ्यात इस्पितळाचे रजिस्ट्रार घाईघाईने थिएटरचा दरवाजा उघडून धापा टाकीत आत आले, "थांबा, हे ऑपरेशन करू नका." शल्यविशारदांना मोठा धक्काच बसला. एरवी गांभीर्य आणि शांततेचा मूर्तिमंत पुतळा म्हणून विख्यात असलेले प्रमुख डॉक्टर; पण त्यांच्या तोंडातून दोन अभद्र अपशब्द निसटले. “******! तुला म्हणायचे काय?" "आता दिल्लीहून फोन आला आहे, या ऑपरेशनला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे." रजिस्ट्रारांनी वाक्य कसेबसे पुरे केले. मुख्यमंत्र्यांचे नाव ऐकताच प्रमुख शल्यविशारदांच्या हातातली सुरी गळून पडली. बरे झाले, ते म्हणाले, "ऑपरेशन सुरू होण्याआधी स्थगिती आदेश आला; छेद घेतल्यानंतर हुकूम आला असता तर मोठी पंचाईत." त्यांच्या एका सहकाऱ्याने विचारले, "सर, आता पेशंटचे काय करायचे?" "आता या केससंबंधी पुढच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडूनच घ्याव्यात," डॉक्टर म्हणाले आणि लांब लांब पावले टाकीत दरवाजा उघडून बाहेर गेले.
 मी हरकत घेतो

 ख्रिश्चन लग्न सोहळ्यात "या विवाहाला कोणाची हरकत आहे काय?" असा प्रश्न विचारला जातो आणि तत्त्वतः कोणीही हरकत नोंदवू शकतो. फाशीच्या

अन्वयार्थ - एक / २१४