पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/207

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कसे सुचावे? किंवा बिहारच्या कोळशाऐवजी घरचा गॅस वापरून गुजराथेत स्वस्त वीज तयार करावी हे त्यांना कसे रुचावे? बिहारचा कोळसा गुजराथमध्ये येतो आहे, गुजराथचा गॅस उत्तर प्रदेशात जातो आहे, चौफेर नासधूस होते आहे, त्याचा बोजा लोकांना सोसावा लागतो आहे.
 स्वयमेव सेवामहे
 सरकारी नोकरांची महत्त्वाकांक्षा याहून मोठी आहे. त्यांचे दुःख हे आहे, की सध्याच्या सगळ्या व्यवस्थेत कोठेतरी महागडी का होईना वीज तयार होते आहे आणि वरखते तयार होत आहेत! हे त्यांना लांछनास्पद वाटते. कोळसा, वायू यांची वाहतूक तर झाली पाहिजे; पण प्रत्यक्षात उत्पादन मात्र काहीही होता नये. स्वतःचीच सेवा करणारी कार्यालये उभी राहावीत हेच ध्येय.

(१० फेब्रुवारी १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २०८