पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चाखायला मिळालेलीच नाही. आपण होऊन काही उत्पादन करावे ही कल्पनाच रशियन व्यवस्थेत दुरापास्त वाटते. हिंदुस्थानसारख्या गरीब देशातही शहरातील दुकाने मालाने भरून वाहत असतात, याचे येथे येणाऱ्या रशियन प्रवाशांना मोठे आश्चर्य वाटते. व्यवस्था ढासळलेली आणि नवीन व्यवस्थेकरिता लागणारे जर्मन, गुण अभावानेच तळपणारे... अशा परिस्थितीत हुकूमशहा येणे आणि तो हिटलरपेक्षाही भयानक असणे अपरिहार्य आहे. हातात अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, असलेला रशियन सुपर हिटलर म्हणजे पृथ्वीचा नाश करणारा कल्की होऊ शकतो.
 रशियातील निवडणुकांतील फॅसिस्टांची सरशी झाली त्यापेक्षाही विशेष गोष्ट म्हणजे साम्यवादी पक्षांची डाळ फारशी शिजली नाही. हुकूमशाही चालेल; पण अर्थवादी हुकूमशाही उपयोगाची नाही. एवढे रशियन नागरिकांना ८० वर्षांच्या अनुभवाने पुरेपूर उमजले आहे. कदाचित राष्ट्रवादी किवा वंशवादी हुकूमशही आली तर आपले भाग्य फळफळेल अशी निदान कल्पना करण्यात त्यांना आनंद वाटतो. लोकशाही व्यवस्थेत, बाजारपेठेच्या आधाराने, उत्पादन आणि उद्योजक यांच्या कर्तबगारीने खुली व्यवस्था उभी करण्यासाठी एक संयम लागतो. एक चरित्र लागते. मनाची एक शिस्त लागते, दीर्घकाळ कणाकणाने आणि क्षणाक्षणाने प्रयत्न करण्याची जिद्द, चिकाटी लागते. अशा गुणसमुच्चयातून थोर राष्ट्रे बनतात. इतर लोकांना भेटतात 'हिटलर', स्टॅलिन यांच्यासारखे हृदयसम्राट.
 साम्यवाद्याचे प्रचारतंत्र अबाधित

 इतिहासाची पुनरावृती होताना काही विनोदी प्रकार जवळजवळ जसेच्या तसे पुन्हा घडतात. हिटलरचा उदय होत असताना जर्मनीतील समाजवादी कॉम्रेड समाजवादी व्यवस्थेचे तुणतुणे वाजवत राहिले. शेवटी हिटलरने त्यांचा समूळ नि:पात केला. आजच्या रशियातील साम्यवादी पुन्हा तोच कित्ता गिरवीत आहेत. अजूनही सजाजवादी अर्थव्यवस्थेचे तुटकेमोडके समर्थन येणकेण प्रकारे करण्यात ते गर्क आहेत. रशियन लालभाईंचा युक्तिवाद चालूच आहे. रशियन साम्यवादाचा पाडाव झाला खरा; पण तो आर्थिक कमजोरीने आणि अपयशाने नाही . रशियन अर्थव्यवस्था चांगली चालली होती. राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीची रशियन गती अमेरिकन गतीपेक्षा सातत्याने वरचढ राहिली. दुसऱ्या महायुद्धापासून ते थेट १९८१ पर्यत रशियन अर्थव्यवस्था भरभराटीत होती. अमेरिकन व्यवस्थपेक्षा सरस होती, असे जे जगाला आणि स्वतःलाही पटवू पाहत आहेत, जडजंबाल आकडेवारीने सिद्ध करू झाल्यापासून उत्पादन घटते

अन्वयार्थ - एक / १९७