पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजवादाच्या अर्थकारणाची आणि तत्त्वज्ञानाची थोडीतरी रुपेरी कडा होती. रशियात नवा नाझी राष्ट्रवादी हिटलर उदयाला आला तर? कल्पनाच थरकाप भरवणारी आहे. नाझीवादाचा भस्मासुर रशियात उभा राहिला तर त्याच्या हाती सुरुवातीपासून जगाचा तिसरा हिस्सा प्रदेश असेल, अमाप खनिज संपत्ती असेल आणि त्याहीपेक्षा भयानक सगळ्या पृथ्वीचा ५० वेळा विनाश करण्याइतकी अणुशक्ती असेल!

(२ सप्टेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १३१