पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही यावर आंतरराष्ट्रीय देखरेख असावी, असा त्यांचा आग्रह आहे. अणुबॉम्बचा प्रसार होऊ नये यासाठी एक आंतराष्ट्रीय करारही करण्यात आला. जगातील बहुतेक 'अणू नाही रे राष्ट्रांनी त्यावर सही करून अणुबॉम्ब तयार करण्याचा आपला. इरादा नसल्याचे अभिवचन दिले आहे. त्याला एक अपवाद : हिंदुस्थान!
 'आहे रे!' राष्ट्रांच्या मदतीवर जगणाऱ्या हिंदुस्थानने या करारांवर सही करण्यास नकार दिला. "आम्ही शांतताप्रिय आहोत, आम्हाला बॉम्ब बनवण्यात काही स्वारस्य नाही. अणुस्फोटाचे प्रयोग संपूर्णतः बंद झाले पाहिजेत. 'अणु आहे रे' राष्ट्रांनीसुद्धा प्रयोग थांबवले पाहिजेत अशा जागतिक अणुबंदीत भारत सहभागी होईल. याउलट 'आहे रे' राष्ट्रांनी वाटेल तितके अणुस्फोट करावेत आणि 'नाही रे' देशांनी कायमचा अणुसंन्यास घ्यावा हे न्याय्य नाही, नैतिक नाही. यामुळे साऱ्या जगावर 'अणू आहे रे'ची सत्ता होईल." असा भारताचा थोडक्यात युक्तिवाद.
 भिक्षेकऱ्यांची दंडेली
 त्या काळात संयुक्त राष्ट्र संघात आपले प्रतिनिधी अनेक प्रश्नांवर अशातऱ्हेची नैतिक टुरटूर ऐकवत. बनारसच्या भिकाऱ्याने समोरच्या दात्यास मोक्षमार्गाचा उपदेश करावा असला हा प्रकार; पण मोठ्या राष्ट्रांची स्थिती बोलता येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी होती. दोन महासत्तांच्या शीतसुद्धांचा तो काळ, कित्येक किरकोळ देश दोन महासत्तांच्यामध्ये लपाछपीचा खेळ करून आपली हिंमत आणि आढ्यता यांचे प्रदर्शन करीत. सारे जग डोक्यावर तलवार टांगल्याप्रमाणे धास्तीत जगत होते.

 आज अणुबॉम्ब नसलेल्या तिसऱ्या जगातील देशांत अणुबॉम्बची जबाबदारी पेलणारे नेतृत्व असेल किंवा नाही याची 'आहे रे' राष्ट्रांना खात्री नाही. हा धोका घेण्यासारखा विषय नाही. इस्त्राईलकडून वारंवार धूळ खाल्लेल्या अरब लोकांत आणि राष्ट्रप्रमुखात एखादा जरी मुस्लामी बॉम्ब हाती लागला तर इस्त्राईल संपवून टाकू, मग काय प्रलय ओढवायचा असेल तो ओढवो अशी टोकाची भावना होती. कोणत्याही क्षणी लष्करातील कोणीही अधिकारी रणगाड्यांच्या ताकदीवर सत्ता बळकावू शकतो, अशा मर्कटाच्या हाती अणुबॉम्ब लागला तर काय होईल? एखाद्या दहशतवादी संस्थेच्या हाती अणुबॉम्ब लागला तर त्याचे काय भयानक परिणाम होतील याची चिंता 'आहे रे' देशांना वाटते.
 शीतयुद्ध संपताच, हीच वेळ थोडी शिस्त आणण्याची आहे असे ठरवून त्यांनी काम सुरू केले. पहिला बडगा इराकला दाखवण्यात आला; पण त्याबरोबरच

अन्वयार्थ - एक / १०४