पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.







अणुबॉम्ब निर्मितीबाबत साकल्याने
विचार करण्याची गरज



 लालकृष्ण अडवाणी यांनी अणुबॉम्ब बनवावा असे म्हटले आहे. "बॉम्ब तयार करायचा किंवा नाही हा निर्णय करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो आहोत." असा खास मध्यममार्गी पवित्रा नरसिंह राव यांनी घेतला आहे. थोड्याच काळात बॉम्ब न बनवण्याचे अभिवचन भारताने जगाला द्यावे असा दबाव अमेरिका आणि इतर 'अणू आहेरे' देशांकडून येणार आहे.
 डंकेल प्रस्तावावर काहीच दंगल उडाली नाही अशी अणू प्रसारबंदी करारावर उडणार आहे. पुन्हा एकदा 'स्वदेशी' सार्वभौमत्व, 'अमेरिकन साम्राज्यवादी' इत्यादी शब्दांची राणा भीमदेवी फेकाफेक होणार आहे. हे सगळे प्रकरण काय आहे हे थोडक्यात लक्षात घेतले पाहिजे.
 ना बहादुरी, ना सच्चाई
 पहिली गोष्ट - अणुबॉम्ब हाती असण्यात कोणतीही मोठी बहादुरी राहिलेली नाही, अणूचे विभाजन करण्यात विज्ञान आणि तंत्र दोन्ही पातळ्यांवर कठीण किंवा गूढ असे काही उरलेले नाही. पुरेसे उत्सर्जन द्रव्य मिळाले तर पदार्थ विज्ञानशास्त्राचा किंवा अभियांत्रिकीचा कोणीही सामान्य विद्यार्थी घरातील गॅरेजमध्येसुद्धा अणुबॉम्ब बनवू शकतो. विज्ञानाच्या विकासाकरिता अणुविभाजन करण्याची काही आवश्यकता राहिलेली नाही. उत्सर्जन द्रव्य बऱ्या प्रतीचे, पुरेशा प्रमाणात असले, की अणुबॉम्ब बनविण्यात कठीण असे काही नाही.

 दुसरी गोष्ट – भारतीय अणुबॉम्ब आज बनला तरी तो चोराचोरीतून आणि अप्रामाणिकपणातून जन्मलेला असेल. अणुविभाजनाच्या शांततामय उपयोगासाठी आणि संशोधनासाठी अणुराष्ट्रांच्या मदतीने भारतात अणुवीज केंद्रे उभी राहिली. या केंद्रांत तयार होणाऱ्या उर्ल्सजन द्रव्यांची विल्हेवाट कराराप्रमाणे न लावता ती साठवून ठेवल्यामुळे भारताला बॉम्ब बनवणे शक्य झाले आहे. भारताने

अन्वयार्थ - एक / १०२