पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत. कां तप आचरसी करसी व्रत अर्जुन ते मज देई फळेसी ।। २७ ।। सर्व शुभाशुभकर्मफळा जरि अर्पितसे निरहंकातनें ।। तैं सुखदुःखफळास न भोग हि जी बहु जन्म किती मरणे ।। यारिति ज्ञानसमिश्रित अंतर बंधन मिथ्य करी भजने ।। मुक्त असा मज मानि च पावसि तूं करसी म्हण हे कयने ।। २८ ।। तो मि कसा तरि सर्व भूती सम कांचन जेवि समस्त नगांत ।। द्वेष कधी न करी पदिचा पदि मस्तकिंचा प्रिय नाहित याते ।। आणि मला भजती जिवनी जळसिन्धुसरी परि येकरसाते ।। ते मज भीतर मी आंत बाहिर भेद तयां मज नाहिं च नाते ।। २९॥ जो हिन कर्म करी हिन जाति हि नाव शुचि स्मित नाणित वाचे ।। तो अनुताप धरी मज सर्व भुती भजने हरि दोष मनाचे ।। त्यास मि साधु बरोबरि मानित भागिरथी मळ गावरसाचे ।। नीवडती जन त्या परि पावन देखुनि तो मम मानस नाचे ।। ३० ।। ज्या घडि ये मजला शरणागत त्या घडि धर्मस्वरूप चि झाला || पाउनि शांतिसुखा प्रति मद्रप शाश्वत ब्रह्म सूखे समधाला ।। हे कुरुनंदन सांगुं किती तुज भक्ति सुधारस जो नर प्याला ।। तो कधिं नाश न पावतसे हरिभक्त असे म्हणताति तयाला ।। ३१ ।। ने मजला शरणागत निश्चित जाणति ना मज वांचुनि कांहीं ।। तो पशु का बहु पापि हि योनित जन्म तया परि पावन नाहीं ।। स्त्री शिशु वैश्य किं शूद्र हि अंत्यज भक्तित जातिस कारण नाहीं ।। मद्भजने परमा गति पावति कुंटणिका कुबजा निज देहीं ।। ३२॥ या वरि ब्राह्मण क्षत्रिय उत्तम जन्म हि उत्तम कर्म जयचि ।। ते मजला शरणागत त किति वर्ण मि पुण्य अगण्य तयांचे ।। हा बहु दुःखसमुद्र अशाश्वत पाउनि लोक सुनिश्चित केचे। . यांत तुं जन्मसि ते मज ये भज आइक वर्म कसे भजनाचे ।। ३३ ।। हो मज भक्त मनात मला धरि सर्व क्रिया मजलागि समपी ।। सर्व भुभूती मज जाणुनियां नमि अर्जुन हे बहु पद्धति सोपा ।। सर्वभुतात्मक मद्रुप होसिल ब्रह्मपरायण अद्वयरूपी ।। उद्धवचिद्धन सांगतसे गति पावति हे नर जे अनुतापा ।। ३४ ।। नवमोऽध्यायः समाप्तः । ८३ नग-दागिने. ५४ भीतरी आंत. ५५ भागीरथी गंगानदी. ५६ रस-पाणी. ५७ सधा-अमृत. ५८ परमा-उत्तमा.