पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिघनकृत. सर्व भुती मज वोळखती नमिती निज भक्तिस वोळगताती ।। आणि मला मिळती मज ते रिति सिंधु नसा सरितां भरताती ।। १४ ।। ज्ञानहुताशनि दृश्य हवी यनि एकपणे यजने मज कोण्ही ।। एक पृथक्पण विश्व दिसे परि मन्मय भासतसे घटश्रेणी ।। एक बहूरुप हम नगाकृति हम चि जाणतसे बह नाणी ।। विश्वमुखे मज अर्पितसे मेख हा सहज स्थितिचा धनपाणी ।। १५॥ वेद विधान कयीं केतु तो हि मि स्वीह स्वधा मि हि मंत्र हि मी ची ।। औषधि मद्रुप आज्य मि अग्नि हि मी च क्रिया बहुधा हवनाची ।। हूतविधी मि हि आणि हवी मि हि स्वस्वरूपे सकळा समधीची ।। या रित सर्व मि यज्ञ चि जाणति मी स्वरुपें सकळां अमराँची ।। १६ ॥ मी प्रकृतीरुप माय जगाचि च बाप हि मी उपजे जग जेणे ।। ही प्रकृतीपुरुषे मज पासनि तो मि अज जगपाळक जाणे || वेद हि मी च पवित्र हि मी प्रणवाक्षर जेथुनि वेद उठाणे ।। त ऋग साम यजू रुप माझे चि आणिक आइक माझिं ठिकाणे ॥ १७ ॥ मी च गती प्रतिपाळक मी प्रभु मी जननी सकळांतरसाक्षी ।। मी सकळां हृदयीं मज माजि निवास मला शरणास नपेक्षीं । । उत्पति पालन आणि निदान मि मी च निधान तुं या परि लक्षीं ।। बीज मिं अव्यय मी शशिचे परि शुक्ल रचे क्षिण उत्तर पक्षीं ।। १८ ॥ मी च त रविच्या किरणे वरषे नाभिं पाउस होउनियां ।। मी च करीं सकळां प्रति निग्रह मी च सृर्जी बहु लोक तयां ।। मारितसे सकळांस हि मृत्यु मि मी अमृतोपम माझि दया ।। शाश्वत मी च अशाश्वत मी मज वांचुनि ठाव नसे चरया ।। १९ ।। नेणुनि मि त्रय वेदविधी यजिताति सुरा बहु सोमप यागे ।। आणि मनीश्वरकाम चि या चित्तिं पाप समिश्रित पुण्यप्रसंगे। त्या सूकते मन चिंतित पावति भोगति ते दिवि भोग निजांगें ।। कामदुधा घरि सांपडली तिस क्षीर उपेक्षुनि कांजि च मागे ।। २०॥ जो पदरी धन तो कळवंतिण जाण जिवाहुनि आधिक मानी ।। २६ घटश्रेणी मडक्यांचा समूह. २७ मख यज्ञ. २८ क्रतु-यज्ञ. २९ स्वाहा देवांस आहती देते वेळी उच्चारावयाचा शब्द. ३. स्वधा पितरांस पिंड देते वेळी उच्चारावयाचा शब्द. ३१ आज्य-शेळीचे तूप (अजा-शेळी). ३२ प्रकृति स्वभाव. ३३ पुरुष-आत्मा. २१ प्रणष ओंकार. ३५ सोमप-सोमरस पिणारे. ३६ दिवि स्वर्गात. ३७ कामदुघा-कामधेन, ३८ क्षीरदूध. ३९ कांजिण्या .. कळवंतीण वेश्या.