पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-४. सर्व फळे करि त्या सह कर्म जळे शुभ अशुभ होमित तेथें ।। ३३ ।। तें निज ज्ञान कसे तैरि पावसि साधन त्यास परीस उपावा ।। आत्म अनात्मविवेक विचारुनियां अपरोक्ष स्वये निज ठेवा ।। देखसि त्यां प्रति जाउनियां कर दंडवत प्रणिप्रात सुसेवा ।। त्यांसि पुसे भवबंध कसा सुटतो कयिती तुजलागि च देवा ॥ ३४ ॥ होउनियां निज ज्ञान न पावसि मोह असा मग बंधुवधाचा ।। आणि भुते विविधे जरि भासति आत्मरुपी क्षण देखास याचा ।। मी तुज देखिल सर्व हि ईश्वर भाव जसा दृढ होय मनाचा ।। स्वानुभवे डुलशी अरें पांडव होउनि राहास रासि सुखाचा ।। ३५ ।। तूं म्हणसी जरि यास वधीन असे मग पाप तरे न कसे ।। पापि वधोनि मि होईन पापि च संशय हा बहुसाल असे ।। ज्ञान तरी निज हात चढे मग सत्वर स्वात्मसुखें अनयासे ।। मुक्त पर्दी सुखरूप विराजिसि हे निज गूज तुला काथलेसे ।। ३६ ।। जपरिचे समिधा घृत इंधन जाळुनि भस्म करी अनळ ।। ते परि ज्ञानहुताशन जाळुनि कर्म हि भस्म करी सकळ ।। तेय उरे हविता हवि दैवत दावितसे सुखदुःखफळ ।। येथ समस्तहि ब्रह्मस्वरूपकरा हे चिता अनु भस्म मळ ।। ३७ ।। आणिक याहुनि उत्तम योग नसे न दिसे बहुसाल विचारी ।। हे तरि का जरि ज्ञान न साधित तेथ विते अवघे भवहारी ।। ते गुरुपूर्णकृपविण सिद्ध नव्हे गुरुगुह्य असे अवधारी ।। तो गुरु ज्यास कृपा करितो निज सिद्धिस ते समयीं अधिकारी ॥ ३८॥ आवडि जो धरि सद्गुरुचे पाद ज्ञान तयास घेऊ अनयासे ।। आवडि तो धरि जो हवि इंद्रियनिग्रहतां वितरागेहुताशें ।। भक्तिविरक्तिस ऐक्य घडे तयिं ब्रह्म चढे परब्रह्म प्रकाशे ।। ते चि घडी निज शांतिस पावति बोलियला हरि विश्व विलासे ।। ३९॥ ज्यासि गुरूपदि प्रेम नसे तरि ज्ञानविसी बहु मूढ तयाते ।। संशय फार उगा उठतो भवभ्रांति परी मन सैर वहाँते ॥ त्यास नसे इहलोक न स्वर्ग हि पावत नेणसि कोण गती तो ॥ येउनि व्यर्थ चि देह मरे परि स्वप्निं हि नेणत स्वर्गसुखा तो॥ ४० ॥ जाणुनि कर्म करी विधिपूर्वक जे परब्रह्मि समर्पितसे ॥ ५२ कसे परि-कोणत्या रीतीनें. ५३ अपरोक्ष साक्षात् , ५४ वितराग ( वीतराग) गतकाम. ५५ ज्ञानविसी ज्ञानाविषयी. ५६ सैर ( सैरावैरा )=चोहोकडे.