पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-४. पंडित पंडित त्या म्हणती जिहिं जाणितले मज पूर्ण परेशां ॥१९॥ कर्म करी फळआस त्यजी निरहंकृतिने सुखदुःख निवारी ।। संग्रह आणिक रक्षण यातित तृप्त सदा स्वसुखें अविकारी ।। कर्म अकर्मण येथ निराश्रित बद्ध नव्हे कधिं कर्म विकारी । कर्म करी तर तो करिता नव्हे वर्म बुझे पुढती अवधारीं ॥ २० ॥ निर्गतसर्वफळीस तया पुरुषास म्हणे मुनि व्यास निरासी । दाखविना मन बुद्विस भ्रामविना अणुमात्र कदा विषयासी ।। मी मज हे सुतदारपरिग्रह भास नसे सहजे च उदासी ॥ कर्म करी मग केवळ शारिर बाधि च ना सुखदुःख तयासी ।। २२ ॥ प्राप्त जयासि अयाचित इच्छित स्वल्प बहू परि तुष्ट तयाने ।। साहतसे सित उष्णसितादिक हर्ष अमषर्ण द्वंद्व समाने ।। सर्व भुती समता अवलोकुनि सिद्धि असिद्धि अशा स्वसुखाने ।। कर्म करीपरि बद्ध नव्हे कधिं वर्णविशेष न आचरल्याने ।। २२ ।। कॉम फळी न धरीं गतसंग अहंकृतिपासुनि होउनि मुक्त ।। चित्त सदा परब्रह्मविचारण कारण राहतसे मजयुक्त ।। यज्ञस्वरूपक मी च मला करि अर्पण निर्मुनि कर्म समस्त ।। ते न उरे च तथा सच! यापरि ब्रह्मपरायण नित्य विरक्त ॥ २३ ॥ ब्रह्मपरायणकर्म हि ब्रम्ह चि अर्पण ते परब्रम्हि च होते।। ब्रम्हहुताशन ब्रम्ह हवी हविशेष हि ब्रम्ह च ब्रम्ह क्रिया ते ॥ सिंधुजळे जळ मेघनद्याजळ जाउनि मीळति त्या जलधी ते ।। या परि कर्म समस्त हि ब्रम्ह अनुभव येत समा धिषणा ते ॥ २४ ॥ देव सुरेशर माधिप याप्राति ब्राह्मण मानुनियां यजिताती ॥ आग्न हि भिन्न घृतादिक भिन्न अहंकार तात्पुन कर्म करीती ।। ते फळ पाहुनि जन्मुनियां मरती तरि ते चि ते आचरताती ॥ येक असा अणि येक करी परब्रह्म हुताशनि यज्ञसमाप्ति ॥ २५ ।। सांडुनियां विषयां सकळां सहजे मग संयमवन्हि म्हणे ॥ श्रोत्रत्वचानयनारसनादिक प्राणकै हवि जो करणे ।। एक असा अणि येक अहर्निशि इंद्रियवन्हिस पेटवणे ॥ २८ परेश=पर + ईश. २९ यातित=यां विरहित. ३० निर्गतसर्वफळ त्यक्त सर्वफळ, ३१ निरासी आशारहित. ३२ दारा-स्त्री. ३३ अमर्षण-क्रोध. ३४ द्वंद्व जोडी. ३५ काम इच्छा. ३६ सख=हे मित्रा. ३७ धिषणा=बुद्धि. ३८ संयमवन्हि-इंद्रियदमनाग्नि. ३९ ऋतु यज्ञ.