पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-२. (३१) चंचळ हे जग निश्चळ हा निज निर्मळ यास श्रुतिस्मृति गाई ॥ शुद्ध सदोदित पूर्ण पुरातन रूप नसे गुण नाम कदा ही ।। २४ ॥ पाहुं तया तरि व्यक्तं नव्हे अविकार अनामय याचि परी ।। देश न वेद पुराण-समुँचय बोलति सर्व हि या न सरी ॥ जाणुनियां पुरुषासि असे मग होशिल तूं निजरूप जरी ॥ या वरि योग्य न होसि कदापि तुं वाहसि व्यर्थ चि शोक-सरी ।। २५ ॥ या वरि नित्य किं जन्मतसे अथवा मरतो जहिं हा चि निजात्मा ।। मानिसि हे जरि सत्य तुंवा करितां न करी मति शोक सुवर्मा ।। कां म्हणसी तरि हे जळ-बुबुंद होउनि नासति तेवि सुकर्मा ।। आनुसरे जनुमरणास महाभुंज हे म्हण बाहुकनामा ॥ २६ ॥ जन्म जयासि तया पहतां न टळे मग काहि करी मरणे ॥ मृत्यु जयासि तयासि च जन्म असे बहुतां परि ओळखणे ।। राहट माळ रिता भरुनी घट तो चि रिता पडतो भरणे ।। आणि कर्धी करवे न म्हणोनि तुं शोकपुरीसि वसेल झणे ॥ २७ ॥ शून्य मुळी प्रसवे भुतपंचक इंद्रधनू गगनीं अवचित्ते व्यक्त तशी बँझ मध्ये च होत भुते निधनी निज निर्गुणजेते ।। स्वानुभवे परब्रम्ह पुरातन नित्य नवी कळली खुण ज्याते हारपले गगनीं जळ किं दुःख करी म्हण मूर्ख तयाते ॥ २८ ॥ दृश्य नव्हे रुप त्या अक्षया प्रति पाहति कोणिहि तमाशा रीघ नव्हे चि परीदिनि शब्द तया वचने प्रतिपादिति कैसा ॥ आणिक कोणिहि ऐकति त्या दशनावाने परियेसा पाहाति बोलति ऐकतिही जरि कोणि न जाणति तथ्यपरेसा ॥ २९ ॥ सर्व हि देहि असे भरला परि वध्य नव्हे मण शाश्वत जाणे है भरतोत्तम सर्व भुते मुळिची लटकी बांधिजेतिल कोणे ।।। आणिक ही निज धर्म विचारिस आइक तो बहु सावध करणे कांहिं करी परि योग्य न होशिल शोक करूं शिणसील शिणाने ॥ ३०॥ पाहसि तूं निज धर्म ऋतूतरि वाढिव होउन कीर्ति वरावी ७३ व्यक्त-दृश्य. ७४ अनामय-रोगरहित. ७५ समुच्चय-समूह. ७६ सरी बरोबरी. ७७ बदबुद-बुडबुडा. ७८ महाभुज हे महाबाहो. ७९ बुझ जाण. ८० ॥ जळ" शब्दापडील दोन अक्षरें कमी आहेत. ८१ परादिपरा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे चार वाणीचे प्रकार. ८२ प्रतिपादितिम्वणिती. ८३ ध्वनि' शब्दापुढील चार अक्षरें कमी आहेत, ८४ ह्मण-ह्मणून. ८५ करणे अतःकरणाने.